दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. पारंपरिक पणत्या, आकाशदिवे, लायटिंग असं सगळं तर आपण त्या दिवशी लावून आपलं घर सजवतोच. पण त्यासोबतच वेगवेगळे दिवेही उत्साहाने लावतो. हल्ली तर पाण्यावर तरंगणारे दिवे, पाण्यावर चालणारे दिवे असं बरंच काही बाजारात मिळतं. तेलाऐवजी पाणी टाकून चालणारे जे दिवे असतात, ते तर अगदी काहीच्या काही किमतीला विकले जातात. पण आपण जर घरीच हे दिवे करायला गेलो तर ५ रुपयांपेक्षा जास्त खर्च येत नाही (How to make water diya in just 2 minutes?). म्हणूनच तर त्या दिव्यांसाठी एवढे पैसे घालविण्यापेक्षा ही सोपी ट्रिक पाहा आणि पाण्यावर तरंगणाऱ्या सुंदर दिव्यांनी तुमचं घर उजळवून टाका...(How to make water diya at home)
पाण्यावर तरंगणारे दिवे कसे तयार करायचे?
याविषयीचा एक व्हिडिओ thekaurartofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
यासाठी आपल्याला एक काचेचा ग्लास, १ फुलवात, ॲल्युमिनियम फॉईलचा एक छोटासा तुकडा आणि १ टेबलस्पून तेल एवढं सामान लागणार आहे.
सगळ्यात आधी तर ॲल्यूमिनियम फॉईल गोलाकार कापून घ्या. फुलवातीचा बेस जेवढा असतो, तेवढाच तिचा आकार ठेवा. त्या फॉईलला मधोमध एक छिद्र पाडा आणि त्यात फुलवात घाला. वात वर अणि फुलवातीचा बेस खाली अशा पद्धतीने वात घालावी.
यानंतर जवळपास पाऊण ग्लास पाणी घ्या. त्या तेल टाका. त्यावर आता ॲल्यूमिनियम फॉईलमध्ये अडकवलेली वात घालून टाका.
दिवाळीला पाण्याखालची रांगोळी काढण्याची बघा १ खास ट्रिक- करा सुंदर डेकोरेशन- घर सजेल सुंदर
त्या वातीच्या आजुबाजुला तुम्ही फुलांच्या पाकळ्या टाकून सुशोभित करू शकता.
किंवा ग्लासमधल्या पाण्यात जर वेगवेगळे रंग टाकले तर छान रंगबेरंगी वॉटर दिया तयार होतील आणि तुम्ही ते पायऱ्यांवर किंवा अंगणार, रांगोळीमध्ये छान सजवून ठेवू शकाल.