Lokmat Sakhi >Social Viral > केमिकल कशाला, घरच्या घरी बनवा ऑरगॅनिक धूप, घर राहील फ्रेश - कायम सुगंधित

केमिकल कशाला, घरच्या घरी बनवा ऑरगॅनिक धूप, घर राहील फ्रेश - कायम सुगंधित

Making of Organic Dhoop Sticks at Home धुपाच्या वापरामुळे घर कायम प्रसन्न राहते, बाजारातून धूप आणण्यापेक्षा कमी साहित्यात घरी धूप बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 06:04 PM2023-04-04T18:04:23+5:302023-04-04T18:20:49+5:30

Making of Organic Dhoop Sticks at Home धुपाच्या वापरामुळे घर कायम प्रसन्न राहते, बाजारातून धूप आणण्यापेक्षा कमी साहित्यात घरी धूप बनवा

Making of Organic Dhoop Sticks at Home | केमिकल कशाला, घरच्या घरी बनवा ऑरगॅनिक धूप, घर राहील फ्रेश - कायम सुगंधित

केमिकल कशाला, घरच्या घरी बनवा ऑरगॅनिक धूप, घर राहील फ्रेश - कायम सुगंधित

पुजेसाठी आणि घरातल्या इतर कामांसाठी धूपाचा वापर केला जातो.  घर सुगंधित होण्यासाठी धुप लावणं उत्तम मानलं जातं. बाजारातून आणलेल्या धूपात केमिकल्स असण्याची शक्यता असते. जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. केमिकलयुक्त धुपाचा धूर फुफुसात गेल्याने अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे घरगुती धूप करून पाहा. सुगंधित धूप आपण घरच्याघरी देखील बनवू शकता.

अगदी कमीत कमी खर्चात ऑरगॅनिक धूप तयार होईल. यात आपण नारळाच्या केसांचा वापर करणार आहोत. ज्याचा वापर सहसा होत नाही, ते फेकले जातात. हे धूप आपण बनवून साठवून ठेवू शकता. या धुपाच्या वापरामुळे डास देखील घरातून पळून जातील. व घर कायम फ्रेश व सुगंधित राहेल. चला तर मग सुगंधित धूप बनवण्याची झटपट पद्धत पाहूयात(Making of Organic Dhoop Sticks at Home).

सुगंधित धूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य

नारळाच्या केसांची पावडर 

गुलाबाच्या पाकळ्या 

चंदनाची पावडर 

सुपर मार्केटमधून खरेदी केल्यानंतर कॅरीबॅगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात? हे योग्य की अयोग्य, कायदा सांगतो..

कापुराची पावडर 

तूप 

या पद्धतीने बनवा सुगंधित धूप

सर्वप्रथम, एक मोठी प्लेट घ्या, त्या प्लेटवर एक चाळण ठेवा, व त्यात नारळाच्या केसांची पावडर, कोरड्या गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर, चंदनाची पावडर, कापुराची पावडर, लाकडाची पावडर, घालून चाळून घ्या. प्लेटमध्ये चाळलेल्या पावडरमध्ये एक चमचा तूप घालून मिश्रण मिक्स करा. हाताने हे मिश्रण पिठाच्या गोळाप्रमाणे तयार करा.

जमिनीवर मांडी घालून बसण्याचे ५ फायदे, खाली बसताच येत नाही असं होण्यापूर्वी बदला सवयी

गोळा तयार झाल्यानंतर त्याचे छोटे - छोटे धूप तयार करा. धूप तयार झाल्यानंतर यांना पंख्याच्या हवा खाली किंवा उन्हात सुकवून घ्या. अशा प्रकारे सुगंधित धूप तयार. आपण यात इतर सुगंधित पदार्थ घालून देखील बनवू शकता.  

Web Title: Making of Organic Dhoop Sticks at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.