मलायका अरोरा व्यायाम, योगासनं, फिटनेस (fitness, yoga) याबाबतीत एवढी पक्की आहे की तिच्या रोजच्या वर्कआऊटमध्ये (workout) सहजासहजी कोणताही खंड पडत नाही. या बाबतीत बरोबरी करणारी दुसरी एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty). शिल्पाचा तर सध्या पाय फ्रॅक्चर आहे, तरीही बसल्या बसल्या शक्य होतील, असे व्यायाम (exercise) करण्याचा तिचा प्रयत्न असतोच. मलायका (Malaika Arora) देखील तिच्या चाहत्यांना दर सोमवारी न चुकता फिटनेस मोटीव्हेशन देत असतेच. आता नुकताच तिने जो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे, त्यातही तिने तिच्या चाहत्यांना फिटनेसबाबत प्रेरणा तर दिली आहेच, पण तिच्या खास स्टाईलमध्ये शिक्षकांना टिचर्स डे (Malaika Arora celebrates teachers day) च्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
शिक्षक दिनानिमित्त प्रत्येकानेच आपापल्या शिक्षकांना जसे शक्य होईल, तशा शुभेच्छा दिल्या. पण मलायकाची शुभेच्छा देण्याची पद्धत मात्र तिच्या चाहत्यांना आणि नेटिझन्सला विशेष आवडली आहे.
जास्वंदाचा चहा, केसगळती थांबविण्याचा सोपा उपाय.. फक्त २ पदार्थ वापरा, केस गळणं होईल कमी
शुभेच्छा देण्यासाठी तिने तिचा व्यायाम करतानाचा एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती मलासन, शिर्षासन, वीरभद्रासन, भुजंगासन हे काही योगासनांचे प्रकार करताना दिसतेय तर काही प्रकार तिने जीम वर्कआऊटचेही केले आहेत.
शिक्षकांना शुभेच्छा देताना मलायका म्हणते...
या व्हिडिओला तिने जी कॅप्शन दिली आहे, त्यात ती म्हणते की आजचा दिवस नेहमीसारखा मुळीच नाही. तो खूप खूप खास आहे. कारण आज शिक्षक दिन आहे.
दरवाज्यांचे हॅण्डल्स, कड्या स्वच्छ करण्यासाठी ३ सोपे उपाय, कडी- कोंडे होतील चकाचक
शिक्षक आपल्याला मार्गदर्शन तर करतातच पण आपल्या ज्या क्षमतांना आपण ओळखूही शकत नाही, त्यांना शिक्षक उत्तम प्रकारे विकसित करतात. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवतात. आपले ध्येय गाठण्यासाठी मदत करतात आणि आपली प्रगती पाहून खूश होतात. शिक्षकांना थॅंक यू म्हणणं हे कधीच पुरेसं ठरत नाही. कारण त्यांनी आपल्याला घडवायला जे काही प्रयत्न केलेले असतात, त्यापुढे आपलं थँक यू अगदीच लहान आहे. जगाला आणखी शिक्षकांची गरज आहे, असंही तिने म्हटलं आहे.