अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika arora ) हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे चाहते या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे कपल्स अनेकदा सोबत वेळ घालवताना दिसतात. (Malaika arora give special surprise gift) दरम्यान, अलीकडेच मलायकाने तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या 3 दिवस आधी एक खास भेट दिली आहे. (Malaika arora give special surprise gift to boyfriend arjun kapoor see photo)
खरं तर, 26 जूनला अर्जुनचा वाढदिवस असतो आणि गर्लफ्रेंड मलायका अरोराला त्या दिवशी त्याला स्पेशल वाटावं,असं वाटतं. त्यासाठी तिनं वाढदिवसाची तयारी सुरू केली आहे. अर्जुनच्या वाढदिवसाआधीच मलायकाने त्याच्यासाठी एक नाही तर अनेक भेटवस्तू पाठवल्या आहेत, याची माहिती स्वतः अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. गुरुवारी अर्जुन कपूरने मलायकाने दिलेल्या भेटवस्तूची एक झलक त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.
भेटवस्तूचा फोटो शेअर करताना अभिनेत्याने एक गोंडस पत्र लिहिले आहे. अर्जुन लिहितो की 72 तास आधी ती तुम्हाला आठवण करून देते की हा तुमचा वाढदिवस वीकेंड आहे. मलायकाने अर्जुनला पाठवलेले गिफ्ट ब्लॅक अँड व्हाईट कलरच्या गिफ्ट रॅपमध्ये पॅक केलेले आहे.
सुनेला पहिल्यांदा टिव्हीवर बघताच सासरा भलताच खूश झाला; आनंदाच्याभरात काय केलं पाहा
मलायका अरोरासोबत अर्जुन कपूर क्वालिटी टाइम घालवण्यासाठी आणि रोमँटिक व्हेकेशन साजरे करण्यासाठी पॅरिसला रवाना झाला होता. दोघेही नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भयंकर! रूट कॅनल नंतर बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; खरंच ही ट्रिटमेंट इतकी धोकादायक असते?
अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर मलायका अर्जुनला डेट करत आहे. मलायका वयाने अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. वयाच्या फरकामुळे त्यांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. पण मलायका आणि अर्जुन हे दोघे एकमेंकासह खूप आंनदी असल्याचं दिसतं. २०१९ मध्ये अर्जुनच्या वाढदिवसाच्यादिवशी त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.