(Image Credit- Twitter, Social Media)
वयाच्या १५ वर्षापासून मुलींच्या शिक्षणासाठी लढा देणारी मलाला युसूफझाई ही जगभरात प्रसिद्ध झालेली पाकिस्तानची प्रचंड धाडसी मुलगी. मलाला युसुफझाईने इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे ९ नोव्हेंबर रोजी असर मलिकसोबत लग्नगाठ बांधली. त्यांनी ही घोषणा करताच लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी काही युजर्सनी ट्विटरवर या निर्णयाला पाठिंबा दर्शवलेला नाही. नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसुफझाईने तिच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. (Malala yousafzai write on decision to get married after saying she did not believe in it )
या वर्षी जुलैमध्ये मलालाने वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. "मुझे अभी भी समझ राहा है कि लोगों को शादी क्यों करनी है. अगर आप अपने जीवन में एक व्यक्ति को चाहते हैं, तो आपको शादी के कागजात पर हस्ताक्षर करने की क्या जरूरत है, यह सिर्फ एक साझेदारी क्यों नहीं हो सकती?" अशी तिची स्पष्ट भूमिका होती.
त्यामुळे आता स्वत: मलालानेच लग्नाचा निर्णय घेतल्यानं सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगला प्रतिसाद म्हणून आणि सर्वसाधारणपणे तिच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी, मलालाने 11 नोव्हेंबरला व्होगसाठी एक लेख लिहिला, ज्याचे शीर्षक आहे. 'मला एक सर्वोत्तम मित्र आणि साथीदार मिळाला'. मलालाचा लग्न न करण्याचा निर्णय कसा परिपूर्ण नव्हता याबाबत तिनं सांगितलं.
मलाला युसूफझाई म्हणाली, "मी विवाहाच्या विरोधात नव्हते. परंतु मी त्याच्या अभ्यासाबाबत सावध होते. मी लग्नसंस्थेमुळे पितृसत्ताक पद्धतीमुळे विवाहानंतर महिलांनी केलेल्या तडजोडी आणि नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो यावर प्रश्न उपस्थित केला. याशिवाय लग्नानंतर स्त्रियांनी ज्या तडजोडींना विरोध केला पाहिजे आणि नातेसंबंधांसंबंधीचे कायदे अनेकांमध्ये सांस्कृतिक नियम आणि गैरप्रकारांवर कसे प्रभाव टाकतात यावर अभ्यास केला. पण नंतर मैत्रिणींसोबतच्या संभाषणांमुळे विवाह संस्था कशी चांगली आहे हे समजण्यास मला मदत झाली. खरोखरच ते पितृसत्ताक आणि जाचक असे नाही. तेव्हा मी लग्नाकडे एका नवीन दृष्टीकोनातून पाहिले.''
पती असर मलिक यांच्यासोबतच्या नात्याबाबत तिनं सांगितले की, ''२०१८ मध्ये असर आणि आमच्यात चांगली मैत्री झाली. मला जाणवलं आमच्यात काही समान मूल्य आहेत एकमेकांसोबत राहून आम्ही आयुष्याचा जास्त चांगला आनंद घेऊ शकतो. तेव्हापासूच प्रत्येक सुख दु:खात आम्ही एकमेकांच्या सोबत होतो. वैयक्तीक आयुष्यातील चढ उतारावरून एकमेकांना समजून घेत होतो अखेर आम्ही आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला.''
कोण आहे मलालाचा पती असर मलिक
मूळचे पाकिस्तानचे असर मलिक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हाय परफॉर्मन्स सेंटरचे महाव्यवस्थापक म्हणून काम करतात. २०२० मध्ये ते या पदावर रुजू झाले. असर मलिक त्याच्याकडे लास्ट मॅन स्टँडसची फ्रांचायजीही आहे. एप्रिल २०१९ ते मे २०२० या कालावधीत असर पाकिस्तान सुपर लीगमधल्या मुलतान सुलतान्स संघासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते.
असर यांनी लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स येथून बॅचलर ऑफ सायन्सचे शिक्षण घेतले आहे. पदवीसाठी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. याशिवाय त्यांनी थिएटर प्रॉडक्शनशी निगडीत ड्रामालाईन या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.