इंटरनेटवर असे काही व्हिडिओ व्हायरल होतात जे काही क्षणात मनाला भिडतात आणि भावूक करतात. सध्या ऑनलाइन वेगाने व्हायरल होत असलेल्या एका क्लिपमध्ये, एका व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाला मुलाने आश्चर्यचकित केल्यावर रडू कोसळले. (Man Breaks Down After Son Surprises) बापलेकाचं हे प्रेम पाहून तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. (Man breaks down after son surprises him on his birthday viral video will move you as well)
आता व्हायरल झालेला व्हिडिओ ट्विटरवर जिंदगी गुलजार है नावाच्या पेजने शेअर केला आहे. एक मुलगा टेबलकडे जाताना दिसत आहे जिथे त्याचे वडील त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह बसले होते. दुसर्या व्यक्तीने वडिलांचे डोळे झाकले आणि सरप्राईज दिलं. आनंदी आणि भारावून गेलेल्या वडीलांनी आपल्या मुलाकडे धाव घेत त्याला घट्ट मिठी मारली. या पुनर्मिलनाने आजूबाजूच्या प्रत्येकाला भावूकही केले.
ऑनलाइन शेअर केल्यानंतर व्हिडिओला 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. क्लिप पाहिल्यानंतर नेटिझन्स फक्त भावूक झाले आणि त्यांनी कमेंट्स विभागात त्यांच्या गोड प्रतिक्रिया शेअर केल्या. "एक उत्साही पालक जो आपल्या मुलावर निस्वार्थपणे प्रेम करतो," एका वापरकर्त्याने लिहिले. बाप लेकाच्या नात्याचा हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सनाही आपले बालपण आठवले आहे.