Join us  

कमालच केली! पठ्ठ्यानं फक्त १० सेकंदात परफेक्ट साडी नेसली; पाहा झटपट साडी नेसण्याची ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 10:37 AM

Man drapes saree at a store : तुम्ही अनेक दुकानात पाहिलं असेल की विक्रेते साडी अगदी वेगानं नेसून दाखवतात. 

चापून चोपून साडी नेसणं काही खायचं काम नाही. रोज साडी न नेसणाऱ्या महिलांना चांगलीच आयडिया असते की साडी नेसणं किती कठीण काम असतं. परफेक्ट साडी नेसण्यासाठी तासनतास वाया घालवावे लागतात. अनेकांना साडी नेसणं म्हणजे खूप कठीण वाटतं कारण  साडी नेसल्यानंतर व्यवस्थित चालता येत नाही, हालचाल करता येत नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल. त्याला कारणही तसंच आहे.  (Man drapes saree at a store internet amused with his skills see viral video)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर  १७ डिसेंबरला शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओच्या सुरूवातीला  एक दुकानदार  दिसतो.  टेबलावर उभं राहून काळ्या रंगाच्या साडीचे प्लेट्स सेट करताना दिसतो.  नंतर साडीला आतमध्ये टक इन करतो. त्यानंतर साडीला फायनल लूक देण्यासाठी  टचअप करतो.  सोशल मीडिया युजर्सचं लक्ष या व्हिडिओनं लक्ष वेधून  घेतलं आहे. कारण हा माणूस खूप सहज आणि वेगवान साडी नसतो.

मऊ, लुसलुशीत भाकरी बनवा 'या' ५ टिप्सनी; परफेक्ट भाकरीसाठी उपयुक्त पद्धत

तुम्ही अनेक साडींच्या दुकानात पाहिलं असेल की विक्रेते साडी अगदी वेगानं नेसून दाखवतात.  या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे की, 'भावानं मला ही साडी खरेदी करण्यासाठी भाग पाडलं.' शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ ४७ हजारवेळा पाहण्यात आला आहे तर १ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत. मदनी बाजाराच्या गल्लीजवळ, गली दस्तगीर वाली, गुरजनवाला. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया