Lokmat Sakhi >Social Viral > पठ्ठ्याने वर्षभरात फस्त केली ६ लाख रुपयांची इडली, हा ‘इडली दिवाना’ नक्की आहे कुठला?

पठ्ठ्याने वर्षभरात फस्त केली ६ लाख रुपयांची इडली, हा ‘इडली दिवाना’ नक्की आहे कुठला?

Man from Hyderabad spends Rs 6 lakh on Idli in 1 year भारतात वर्षभरात लोकांनी नेमकी किती इडली खाल्ली असेल? पाहा आकडेवारी काय सांगते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2023 01:12 PM2023-03-31T13:12:52+5:302023-03-31T13:13:46+5:30

Man from Hyderabad spends Rs 6 lakh on Idli in 1 year भारतात वर्षभरात लोकांनी नेमकी किती इडली खाल्ली असेल? पाहा आकडेवारी काय सांगते..

Man from Hyderabad spends Rs 6 lakh on Idli in 1 year | पठ्ठ्याने वर्षभरात फस्त केली ६ लाख रुपयांची इडली, हा ‘इडली दिवाना’ नक्की आहे कुठला?

पठ्ठ्याने वर्षभरात फस्त केली ६ लाख रुपयांची इडली, हा ‘इडली दिवाना’ नक्की आहे कुठला?

सकाळी नाश्त्याला गरमागरम वाफाळती इडली खाणं अनेकांना आवडतं. इडली आता जगभर मिळते. म्हणून ३० मार्च हा दिवस ''जागतिक इडली दिन'' घोषित करण्यात आला आहे. लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना इडली आवडते. मऊ - लुसलुशीत पांढरीशुभ्र इडली, सोबत सांबार-चटणी किंवा तूप व खोबऱ्याची चटणी लोकं चवीने खातात. या दिवसाचे औचित्य साधत फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने एक मजेशीर आकडेवारी प्रसिध्द केली आहे. आणि नवल वाटेल पण ती माहिती सांगते की एका पठ्ठ्यानं एका वर्षांत चक्क सहा लाख रुपयांची इडली ऑर्डर केली आणि फस्तही केली(Man from Hyderabad spends Rs 6 lakh on Idli in 1 year).

३० मार्च २०२२ ते २५ मार्च २०२३ पर्यंत, तब्बल ३३ मिलीयन प्लेट इडलीची डिलिव्हरी या ॲपद्वारे करण्यात आली.  हैदराबाद येथील एकाच व्यक्तीने एका वर्षांत सहा लाख रूपयांच्या इडल्या ऑर्डर केल्याचे ही आकडेवारी सांगते. बंगळुरू आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये प्रवास करताना, या व्यक्तीने मित्र आणि कुटुंबासाठी एकूण ८, ४२८ प्लेट्स इडली ऑर्डर केली.

काकूंचा गारेगार देसी जुगाड फ्रिज नाही तर फॅन लावून केली कुल्फी, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

इडली ऑर्डर करण्यात चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद सारखी शहरे आघाडीवर आहेत. मुख्य म्हणजे सकाळी ८ ते १० च्या दरम्यान, इडली अधिक प्रमाणावर ऑर्डर केली जाते. त्यामुळे नाश्त्यासाठी इडली किती आवडीचा पदार्थ आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

गालावर खळी...प्रत्येकाच्या गालावर खळी का पडत नाही? खळी पडण्याचे नेमके कारण काय..

इडली सोबत लोकांना काय खायला आवडतं

१. रवा इडलीला बंगलोरमध्ये सर्वाधिक पसंती मिळाली. 

२. घी/ नेयी करम पोडी इडली, मिनी इडली आणि थट्टे इडलीचे खवय्ये तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणात सापडतील.

३. सांबार, सागू, तूप, लाल चटणी, खोबरा चटणी, करमपुरी आणि चहा बरोबर अनेकांना इडली खायला आवडते.

४. मसाला डोसा मागोमाग इडलीच लोकांची फेवरेट आहे.

Web Title: Man from Hyderabad spends Rs 6 lakh on Idli in 1 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.