Join us  

जोडपं पहिल्यांदाच विमानात बसलं इंग्लिश जराही कळत नव्हतं, अनोळखी व्यक्तीनं केलं असं काही.....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 11:59 AM

उत्तर प्रदेशच्या सुदूर गावात वास्तव्यास असलेलं जोडपं पहिल्यांदाच विमानात बसलं त्यांना विमानातील बारीक सारीक गोष्टींबद्दल अजिबात कल्पना नव्हती.  

आपणा सर्वांनाच एकामेकांप्रती दयाळू राहून जितकं होईल तितकं इतरांची मदत करायला हवी. याचाच एक प्रेरणादायी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.((Chief Inspiration Officer Amitabh Shah)   अधिकारी अमिताभ शाह यांनी  विमानतळावर एका वयस्कर दाम्पत्याला पाहिलं आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद केला. उत्तर प्रदेशच्या सुदूर गावात वास्तव्यास असलेलं जोडपं पहिल्यांदाच विमानात बसलं त्यांना विमानातील बारीक सारीक गोष्टींबद्दल अजिबात कल्पना नव्हती.  (Man helps elderly couple from up who boarded a flight for the first time viral story)

यावेळी  त्यांना  एक अनोळखी मित्र भेटला ज्यानं त्यांना मार्गदर्शन केलं इतकंच नाही तर त्याना सॅण्डविचसुद्धा घेऊन दिलं.  ते भुकलेले, थकलेले असतील या विचारानं त्या व्यक्तीनं ही मदत देऊ केली. त्यांनी लिंक्डइनवर दोघांचा फोटो शेअर करत त्यांची स्टोरी फॉलोअर्ससह शेअर केली आहे.  शाह यांनी लिंक्डइनवर या जोडप्याचा फोटो शेअर करत लिहिले की, 'मी काल दिल्ली विमानतळावरून कानपूरला जात होतो. यावेळी हे थकलेले प्रवासी  मला दिसले.

युपीच्या एका गावातून आले होते. दिल्लीच्या विमानतळावर जाण्यासाठी ८ तासात मी बसमधून प्रवास केला आणि नंतर कानपूरच्या विमानातून प्रवास सुरू केला. बोर्डींग क्षेत्र पूर्णपणे अनोळखी होते. अशा स्थितीत मी असं जोडपं पाहिलं जे पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत होते त्यांना इंग्रजी अजिबात येत नव्हतं.  मी त्यांच्याजवळ जाऊन माझ्या मागे यायला सांगितलं तेव्हा त्यांना वाटलं की एअरलाईनचं काम केलं असावं. 

मी त्यांचा फोटो काढावा अशी त्या प्रवासी महिलेची इच्छा होती. कारण त्यांच्या मुलाला आपले आईबाबा सुखरूप आहेत हे दाखवण्यसाठी फोटोचा अट्टहास होता. 'तुम्ही आमचा फोटो काढू शकता का. मला आमच्या मुलाला पाठवायचा आहे.' असं मावशींना मला विचारलं. त्यांना दोघांना  मी एक एक पनीर सॅण्डवीच आणि ज्यूस दिला. त्यांनी मला त्याचे पैसेही दिले.  विमान लॅण्ड झाल्यानंतर आम्ही आमच्या रस्त्याला जायला निघालो त्यावेळी त्यांनी माझ्याकडे बघून स्माईल दिली.' सोशल मीडियावर या स्टोरीनं लोकांचं मन जिंकलं आहे. या व्यक्तीच्या दयाळूपणाचे सोशल मीडिया युजर्स कौतुक करत आहेत. पण ही स्टोरी सोशल मीडियावर पोस्ट करण्याची गरजच नव्हती, असं काहीजणांचं म्हणणं आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया