वधू किंवा वर शोधण्यासाठी लोक काय-काय करतात? नातेवाईकांना आपला लग्नाचा बायोडेटा शेअर करतात. मॅट्रिमोनिअल साइट्सची मदत घेतात किंवा वर्तमानपत्रात जाहिराती देतात. अशा प्रकारे वधू किंवा वराची शोध मोहीम सुरु होते. जोपर्यंत आपल्या मनासारखा जोडीदार मिळत नाही, तोपर्यंत आपली शोध प्रक्रिया चालू राहते (Marriage). जेव्हा आपल्याला मनासारखा जोडीदार भेटतो, तेव्हा आपण आपली शोध प्रक्रिया थांबवतो (Social Viral).
पण मध्यप्रदेशात एका पठ्ठ्याने वधू शोधण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. त्याने आपला बायोडेटा चक्क ई-रिक्षावर चिटकवला आहे, आणि त्याने ही रिक्षा गावभर फिरवली(Man looking for a bride puts up hoarding on e-rickshaw with photo, biodata).
लग्न जुळत नव्हतं म्हणून..
आजतकच्या शांतनु भारतच्या रिपोर्टनुसार, 'लग्नाचा बायोडेटा रिक्षाच्यामागे चिटकवल्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या व्यक्तीचे नाव दीपेंद्र राठोड आहे. तो मध्य प्रदेशस्थित दमोहचा रहिवासी आहे. दीपेंद्र राठोडने सांगितले की, 'मला लग्न करायचे आहे, पण लग्नासाठी मनासारखी मुलगी मिळत नाही'. समाजात महिलांच्या कमतरतेमुळे लग्न जुळत नसल्याचं त्याने सांगितलं.
वेळीच घरच्या घरी वॉटर प्युरिफायर साफ करा; नाहीतर तुमच्याही फिल्टरमध्ये जमा होतील लाल अळ्या
दीपेंद्र पुढे सांगतो की, 'वधू शोधण्यासाठी मी एका मॅरेज ग्रुपमध्ये अॅड झालो. पण मला दमोह येथे राहणारी एकही महिला सापडली नाही, आणि इतर गावातल्या मुली लग्न झाल्यानंतर दमोहला यायका तयार नाही. त्यामुळे ई-रिक्षांवर होर्डिंग्ज लावण्याचा निर्णय घेतला.'
‘देहाती मॅडम’ची इंग्रजी शिकवणी! डोक्यावर पदर घेऊन फाडफाड इंग्रजी शिकवणारी कोण ‘ती?’
वैवाहिक परिचय
दीपेंद्र राठोड यांनी त्यांच्या लग्नाच्या होर्डिंगवर संपूर्ण तपशील लिहिला आहे. त्यांनी त्यांचे नाव, राशीचक्र, त्यांचा जन्म कधी आणि कुठे झाला, गोत्र, वर्ण, उंची, वजन, रक्तगट याविषयी माहिती दिली आहे. याशिवाय त्याचे शिक्षण, आई-वडिलांची नावे, मोबाईल क्रमांक, ईमेल, पत्ता आणि कामाविषयी माहिती शेअर केली. यासह होर्डिंगच्या शेवटी लिहिले की, ''जात आणि धर्म बंधनकारक नाही. कोणतीही महिला लग्नाच्या प्रस्तावासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकते.'