Join us  

Man Loses His Memory After Sex : पत्नीसह संबंध ठेवत असताना अचानक झाला स्मृतीभंश; डॉक्टरांनी सांगितलं 'मोठं' कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 1:43 PM

Man Loses His Memory After Sex : 66 वर्षीय व्यक्तीने यापूर्वी 2015 मध्ये टीजीएचा अनुभव घेतला होता. ही घटना देखील सेक्स केल्यानंतर लगेचच घडली होती.

पत्नीसोबत सेक्स करताना एका व्यक्तीची स्मरणशक्ती गेल्याची विचित्र घटना आयरलँड मध्ये घडली. शॉर्ट मेमरी डिसीज असलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दहा मिनिटांच्या सेक्सदरम्यान स्मरणशक्ती कमी होण्याच्या विचित्र घटनेने डॉक्टरही हैराण झाले. बुधवारी प्रकाशित झालेल्या आयरिश मेडिकल जर्नलच्या मे महिन्याच्या अंकात या विचित्र प्रकरणाचे विश्लेषण करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की व्यक्तीला अल्पकालीन स्मृतिभ्रंश झाला होता. हा रोग औपचारिकपणे ट्रान्सियंट ग्लोबलॲम्नेशिया अर्थात टीजीए  म्हणून ओळखला जातो. (man making relation with wife lost memory during intercourse rushed to hospital with short term amnesia)

टीजीएला क्षणिक स्मृतीभ्रंश असेही म्हणतात. या घटनेच्या बाबतीत, मेडिकल जर्नलने नोंदवले की संभोगानंतर 10 मिनिटांत त्याची स्मरणशक्ती कमी झाली. सेक्स केल्यानंतर, त्या व्यक्तीने त्याच्या मोबाइल फोनवर तारखेची पाहिली आणि तो अचानक दुःखी झाला की तो त्याच्या लग्नाचा वाढदिवस विसरला आहे. मात्र, त्या व्यक्तीने एक दिवस आधीच लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता.

एका चुकीमुळे कमी होतो पुरुषांचा स्पर्म काऊंट, पुरुषांच्या इन्फर्टिलिटीचे प्रमाण वाढले, मूल होण्यास असमर्थ

मेडिकल जर्नलच्यानुसार, अशी दुर्मिळ स्थिती सामान्यतः 50 ते 70 वयोगटातील लोकांना प्रभावित करते आणि अलिकडील घटनांमधील काही आठवणी स्मृतीतून अदृश्य होतात. काही लोक जे TGA अनुभवत आहेत त्यांना एक वर्षापूर्वी काय घडले ते आठवत नाही. प्रभावित लोक सहसा काही तासांत त्यांची स्मरणशक्ती परत मिळवतात. तथापि, या काळात व्यक्तीला त्याचे नाव, वय आणि इतर मूलभूत गोष्टी लक्षात राहतात.

किती टक्के भारतीय महिला आणि पुरुष करतात लग्नाआधी सेक्स? सरकार आकडेवारीच सांगतेय..

66 वर्षीय व्यक्तीने यापूर्वी 2015 मध्ये टीजीएचा अनुभव घेतला होता. ही घटना देखील सेक्स केल्यानंतर लगेचच घडली होती. सुदैवाने, नंतर त्याला त्याची अल्पकालीन स्मरणशक्ती परत मिळाली. TGA ने पीडित व्यक्तीला ताबडतोब आपत्कालीन वॉर्डमध्ये नेण्यात आले. त्यांच्या न्यूरोलॉजिकल तपासण्या करण्यात आल्या.  आता तो पूर्णपणे सामान्य झाला आणि त्याची स्मरणशक्तीही काही वेळात परत आली.

या आजाराचं कारण काय?

TGA असणा-या लोकांपैकी 10 टक्के लोकांमध्ये आणखी एक भाग असतो, असे आयरिश मेडिकल जर्नलमधील एका विशेषज्ज्ञाने सांगितले जे युनिव्हर्सिटी हॉस्पिटल लिमेरिक येथे न्यूरोलॉजी विभागात काम करतात. टीजीए शारीरिक क्रिया, थंड किंवा गरम पाण्यात अंघोळ, भावनिक ताण, वेदना आणि संभोग यासह अनेक क्रियांशी संबंधित आहे.

2009 मध्ये TGA बद्दल बोलताना, एका तज्ज्ञाने सांगितले की हे उत्तेजकतेमुळे होते आणि त्यामुळे मेंदूला कायमची इजा होते. स्मरणशक्तीशिवाय इतर कोणतीही कमतरता भासत नाही. थोड्या काळासाठी स्मरणशक्ती कमी होते. पीडित लोक आणि त्यांच्या प्रियजनांसाठी ही घटना भयावह आहे, परंतु TGA अधिक गंभीर मानली जात नाही. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यलैंगिक जीवनलैंगिक आरोग्य