महिलांना हाय - हिल्स घालून मिरवायला खूप आवडते. हाय हिल्समध्ये महिलांची उंची दिसते. उंच टाचेचं सँडल घालाणारा एक वर्ग आहे. कुठलाही हाय फॅशन लूक हाय हिल्सशिवाय पूर्ण होत नाही. हाय - हिल्समुळे महिला खूप सुंदर - आकर्षक दिसतात. काहींना हाय हिल्स घालून परफेक्ट चालायला जमते. तर काहींना हाय हिल्स घालून दोन पावलं देखील चालायला जमत नाही. पण एका पठ्ठ्याने हाय हिल्स घालून धावण्याची शर्यत कम्प्लीट केली आहे. व अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे.
स्पेनमधील रहिवासी ख्रिश्चन रॉबर्टो लोपेझ रॉड्रिग्ज या पठ्ठ्याने हाय हिल्स घालून १०० मीटर घावत नवा विक्रम रचला. तो म्हणाला की, ''स्पेनमध्ये हाय हिल्स घालून धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, हे कळताच मी या शर्यतीच्या तयारीला लागलो. या शर्यतीसाठी मला ७ सेमीची हाय हिल्स सँडल घालावी लागली. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी मी खूप मेहनत घेतली''(Man sprints 100-meter in high heels, sets world record).
आपण धावपटू उसेन बोल्ट बोल्टचे नाव ऐकलेच असेल. १०० मीटर पूर्ण करण्यासाठी त्याने ९.५८ सेकंदाचा कालावधी घेतला. तर, रॉबर्टोने १०० मीटर पूर्ण करण्यासाठी एकूण १२. ८२ सेकंद घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रॉबर्टोने उसेन बोल्टपेक्षा फक्त ३.२४ सेकंद जास्त वेळ घेतला. पण याने धावताना रनिंग शूज ऐवजी हाय हिल्स सँडल घातले होते.
किचन नॅपकिन्स धुतले तरी कळकट-कडकच राहतात? ४ टिप्स- नॅपकिन होतील स्वच्छ
अशा परिस्थितीत जर त्यांनी हाय हिल्स न घालता रनिंग शूजमध्ये धावला असता तर, कदाचित त्याने उसेन बोल्टचाही विक्रम मोडला असता किंवा, त्याच्या विक्रमापर्यंत पोहचला असता. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने केली आहे.
पावसाळ्यात घरात ट्यूबभोवती पाकोळ्या-किडे भिरभिरतात? ५ उपाय, किड्यांना न मारता ठेवा घराबाहेर
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ''हा विक्रम करणे रॉबर्टोसाठी सोपे नव्हते, परंतु त्याने खूप सराव करून हा विक्रम पूर्ण केला. सरावासाठी तो उंच टाचांच्या शर्यतीत धावला. रॉबर्टोने सांगितले की तो मधुमेहग्रस्त रुग्ण आहे, पण तरीही त्याने जगाला दाखवून दिले की, तोही सामान्य माणसांप्रमाणे कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकतो.'' या शर्यतीशिवाय रॉबर्टोच्या नावे ५७ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असून, त्यांच्या या नव्या विक्रमाचे नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.