भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही. जेव्हापासून सोशल मिडीयाचा जमाना सुरु झाला आहे, तेव्हापासून विचित्र जुगाड सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. काही वेळेला येथे मजेदार व्हिडिओ व्हायरल होतात, तर बऱ्याचदा लोकं इथे आपलं टॅलेण्ट सादर करतात (Social Viral). हे टॅलेण्ट फक्त डान्स, गायन किंवा अभिनय एवढ्यापुरतंच मर्यादित नसून, जुगाडू टॅलेण्टही प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात.
सध्या असाच एका मुलाचं जुगाडू व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये भाजी शिजवताना मध्येच गॅस संपला (Cooking Tips). पण याने आपली शक्कल लढवत असं काही केलं की, सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडचं आहे(Man uses Water heater rod for cooking food viral).
‘देहाती मॅडम’ची इंग्रजी शिकवणी! डोक्यावर पदर घेऊन फाडफाड इंग्रजी शिकवणारी कोण ‘ती?’
गॅस संपला मग भाजी कशी शिजवली?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गॅसवर भाजी शिजवत आहे, पण तेव्हाच त्याचा गॅस सिलिंडर संपतो. अशा स्थितीत अर्धी कच्ची अर्धी शिजलेली भाजी तशीच पातेल्यात आहे. ती अर्धी कच्ची भाजी शिजवण्यासाठी पठ्ठ्याने वेगळीच शक्कल लढवली.
'बस एक दुलहन चाहिए' वधूच्या शोधात निघाला पठ्ठ्या; ई-रिक्षाच्यामागे चिटकवला लग्नाचा बायोडेटा
त्या व्यक्तीने चक्क वॉटर हिटरची मदत घेतली. त्याने भाजीमध्ये हिटरचा रॉड टाकला आणि स्वीच ऑन केला. रॉडच्या उष्णतेमुळे भाजीमधील पाण्याला उकळी फुटते. शिवाय भाजी बऱ्यापैकी शिजत असते. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याच्या कल्पनाशक्तीला सलाम ठोकला आहे.
नेटकरी म्हणाले..
व्हायरल व्हिडिओला लाखांच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. यावर कमेण्ट करत एका नेटकऱ्याने लिहिले, 'हे धोकादायक आहे कारण याचा स्फोट होऊ शकतो'. तर दुसरा नेटकरी म्हणतो, 'हा माणूस नक्कीच इंजिनियर असेल'. तर आणखी एका युजरने 'भारतात टॅलेण्टची कमतरता नाही' म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियात प्रचंड होत आहे.