Join us  

ताईनं वाचवलं रे! मेट्रोमध्ये डोळा लागला; खाली पडणार तेव्हढ्यात शेजारच्या पोरीनं केलं असं काही.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 4:01 PM

Man was sleeping in metro : व्हिडिओमध्ये मेट्रोमध्ये सर्वजण सीटवर बसलेले दिसत आहेत. समोर एक निळा टी-शर्ट घातलेला मुलगा बसला आहे

सोशल मीडियावर अलिकडेच एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मेट्रोमधला एक प्रसंग टिपण्यात आला आहे. व्हायरल होण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. दिवसभराच्या थकव्यानंतर अनेकांना प्रवासादरम्यान झोप लागते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती या व्यक्तीचा डोळा लागलेला असतो. झोप लागल्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्हालाही हसायला येईल.  मेट्रोमध्ये सर्वजण सीटवर बसलेले दिसत आहेत. समोर एक निळा टी-शर्ट घातलेला मुलगा बसला आहे. (Man was sleeping in metro started falling from seat then girl sitting next to him did this you will not believe see viral video)

जो बसल्या बसल्या झोपला आहे. मुलगा इतका गाढ झोपलेला असतो की झोपताना तो हळू हळू त्याच्या सीटवरून पुढे झुकू लागतो. तेवढ्यात शेजारी बसलेल्या मुलीची नजर त्याच्यावर पडते. मुलगा सीटवरून खाली पडणार इतक्यात मुलीने त्याचा टी-शर्ट धरून त्याला मागे ओढते आणि त्याला खाली पडण्यापासून वाचवते.

या व्हिडीओमध्ये मुलीने काय केले हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. कोणालातरी असे झोपलेले पाहून मुली  पळू लागतात, पण या मुलीने त्या मुलाला पडण्यापासून वाचवले. म्हणूनच लोक त्या मुलीची स्तुती करत आहेत आणि त्याच वेळी झोपलेल्या मुलावर राग काढत आहेत. लोक म्हणतात की मेट्रोमध्ये कोणी इतक्या शांतपणे झोपू शकत नाही.

वाटीभर रव्याच्या होतील १५ ते २० सॉफ्ट, चविष्ट इडल्या; ही घ्या इंस्टंट, सोपी रेसेपी

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोईन शेख नावाच्या युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे 2 लाख लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले- गरीब माणूस नाईट ड्युटी करतो असे दिसते. दुसर्‍याने लिहिले - दीदींनी वाचवले.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल