Lokmat Sakhi >Social Viral > ८ वर्षांच्या प्रयत्नानंतर पठ्ठ्याला Google मध्ये नोकरी मिळाली; कुटुंबियांनी अशी काही रिएक्शन दिली

८ वर्षांच्या प्रयत्नानंतर पठ्ठ्याला Google मध्ये नोकरी मिळाली; कुटुंबियांनी अशी काही रिएक्शन दिली

Man who went home after getting a job : नोकरी मिळाल्यानंतरची कुटुंबियांची रिएक्शन कॅमेरात कैद करण्यात आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 10:25 AM2022-11-15T10:25:41+5:302022-11-15T10:28:46+5:30

Man who went home after getting a job : नोकरी मिळाल्यानंतरची कुटुंबियांची रिएक्शन कॅमेरात कैद करण्यात आली आहे

Man who went home after getting a job in google was stunned to see the reaction of mother and wife | ८ वर्षांच्या प्रयत्नानंतर पठ्ठ्याला Google मध्ये नोकरी मिळाली; कुटुंबियांनी अशी काही रिएक्शन दिली

८ वर्षांच्या प्रयत्नानंतर पठ्ठ्याला Google मध्ये नोकरी मिळाली; कुटुंबियांनी अशी काही रिएक्शन दिली

मोठ्या कंपनीत  नोकरी मिळवण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात पण प्रत्येकाचच स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. त्यासाठी इच्छाशक्तीबरोबरच दिवसरात्र प्रामाणिकपणे मेहनतही करावी लागते. अथ्थक प्रयत्नांनंतर आपल्याला हवी ती नोकरी मिळाल्यानंतर कोणाच्याही चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असेल.  सोशल मीडियावर अशाच एका तरूणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचा पूर्ण दिवसच आनंदात जाईल. केरळच्या या व्यक्तीनं मेहनतीनं  Google कंपनीत नोकरी मिळवली आणि स्वप्न पूर्ण केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोकरी मिळाल्यानंतरची कुटुंबियांची रिएक्शन कॅमेरात कैद करण्यात आली आहे. (Man who went home after getting a job in google was stunned to see the reaction of mother and wife)

UI/UX डिजाइनर  आणि रायटर एडविन रॉय नेटो Advin Roy Netto) ला अलिकडेच प्रोजेक्ट डिजायनरच्या रूपात नोकरी मिळाली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या  माहितीनुसार २०१३ पासून  व्यक्तीचे ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. आपल्या कौशल्यांवर काम करत त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि गुगलमध्ये नोकरी मिळवली. इंटरविव्ह क्लिअर झाल्यानंतर त्यानं जेव्हा आईला आणि पत्नीला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांची रिएक्शन पाहण्यासारखी होती. 

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एडविन रॉय नेटो हा मोबाईल कॅमेरा चालू ठेवून आपल्या पाळीव कुत्र्याला धरून असलेल्या आपल्या आईच्या जवळ जाताना दिसत आहे. त्या विचारतात, 'का हसत आहेस?' त्याची पत्नी विचारते, 'तुझी गुगलमध्ये निवड झाली का?' जेव्हा तो हो म्हणतो तेव्हा त्याची आई कुत्र्यासोबत आनंदाने नाचते. तर त्याची पत्नी त्याला मिठी मारून स्वागत करते. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, 'मी 2013 पासून गुगलकडे अर्ज करत आहे. मी दरवर्षी अर्ज केला. दरवर्षी, जेव्हा मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. मला आश्चर्य वाटते पण  आज अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर अखेर मला नोकरी लागली.'

Web Title: Man who went home after getting a job in google was stunned to see the reaction of mother and wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.