Lokmat Sakhi >Social Viral > ‘बायको कॅन्सरशी लढली; पण जगण्यासमोर..!’- कॅन्सरशी लढणाऱ्या बायकोसाठी नवऱ्यानं लिहिली डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

‘बायको कॅन्सरशी लढली; पण जगण्यासमोर..!’- कॅन्सरशी लढणाऱ्या बायकोसाठी नवऱ्यानं लिहिली डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

लिंकडिन युजर बाबर शेख यांनी लिंकडिनवर आपली पत्नी झाहरा शेख यांच्या कॅन्सरच्या लढाईचा अनुभव (fight with cancer) शेअर केला आहे. नवरा बायकोनं मोठ्या हिंमतीनं दिलेल्या या लढ्याची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 02:34 PM2022-08-19T14:34:18+5:302022-08-19T14:44:42+5:30

लिंकडिन युजर बाबर शेख यांनी लिंकडिनवर आपली पत्नी झाहरा शेख यांच्या कॅन्सरच्या लढाईचा अनुभव (fight with cancer) शेअर केला आहे. नवरा बायकोनं मोठ्या हिंमतीनं दिलेल्या या लढ्याची गोष्ट

Man writes about how his wife fight with cancer. | ‘बायको कॅन्सरशी लढली; पण जगण्यासमोर..!’- कॅन्सरशी लढणाऱ्या बायकोसाठी नवऱ्यानं लिहिली डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

‘बायको कॅन्सरशी लढली; पण जगण्यासमोर..!’- कॅन्सरशी लढणाऱ्या बायकोसाठी नवऱ्यानं लिहिली डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Highlightsकॅन्सर झाला हे वास्तव आहे. पण या वास्तवानं आपलं जगणं बदलू द्यायचं नाही असं बाबर आणि झाहरा या दोघांनी ठरवलं.  संपूर्ण उपचारादरम्यान झाहरा यांनी आपलं काम थांबवलं नाही. पैशासोबत हिंमत, मदत आणि प्रेम खूप महत्वाचं असल्याचं बाबर सांगतात. 

कॅन्सरसारखा आजार हा एका व्यक्तीला झाला तरी त्याच्याबरोबर अख्खं कुटुंब अस्थिर आणि अस्वस्थ होतं. कोलमडून पडतं. पण कॅन्सर (cancer)  झाला तरी आपलं आयुष्य बदलण्याचा त्याला काही अधिकार नाही अशी खूणगाठ बांधली असेल तर मग आजारातून स्वत: उठायला आणि कुटुंबालाही हिंमत द्यायला मदत होते. लिंकडिन युजर बाबर शेख यांनी लिंकडिनवर आपली पत्नी झाहरा शेख यांच्या  कॅन्सरच्या लढाईचा अनुभव शेअर केला आहे. नवरा बायकोनं मोठ्या हिंमतीनं दिलेल्या या लढ्याचा (fight with cancer)  अनुभव वाचताना वाचणाऱ्यांना या दोघांबद्दल कौतुक तर वाटलंच पण हा अनुभव वाचून आपल्यालाही हिंमत मिळल्याच्या प्रतिक्रिया वाचकांनी दिल्या आहेत. बाबर शेख यांच्या लिंकडिनवरील ही पोस्ट  63,000 यूजर्सने लाइक केली आहे. 

Image: Google

6 जानेवरी 2022 पर्यंत बाबर आणि झाहरा शेख यांच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं. बाबर शेख आपल्या व्यवसायात दंग होते तर झाहरा आपल्या नवा नोकरीत स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत होती. तसेच  आपल्या नवऱ्याला व्यवसायात मदतही करत होती.  6 जानेवारीला झाहराच्या छातीत गाठ आल्याचं जाणवलं. जराही वेळ न दवडता लगेच तपासण्या सुरु झाल्या. बऱ्याच तपासण्याअंती झाहराला स्तनाचा कॅन्सर झाल्याचं आणि तो दुसऱ्या टप्प्यात असल्याचं निदान झालं. दोघांच्या नजरेसमोर एक वादळ आपल्याकडे घोंघावत येत असल्याचं दिसलं. सुरुवातीला भीती दोघांनाही वाटली. आता कसं होणार हा प्रश्न दोघांसमोरही होता. पण दोघेही मनाने पक्के होते. आपलं आयुष्य कॅन्सरनं उध्वस्त होवू द्यायचं नाही असा निश्चय दोघांनीही केला. 

झाहारावरील उपचारांमुळे दोघांनाही शारीरिक आणि मानसिक पातळीवर मोठ्या उलथापालथीला सामोरं जावं लागणार होतं. त्यासाठी सोबतीला आपली स्वत:ची माणसं लागणार होती. आपलं घर सोडून ते झाहराच्या माहेरी राहायला गेले. तिथे झाहराची दिनचर्या, तिचा आहार, तपासण्यांचं वेळापत्रक, झोपण्या उठण्याचं वेळापत्रक बारकाईनं ठरवून ते काटेकोरपणे पाळायला सुरुवात केली. 

Image: Google

सहा महिन्यांच्या केमोथेरेपीनंतर झाहराचे केस गेले, काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला, तोंडाची चव गेली, कित्येक दिवस तिला केवळ पाण्यावर राहावं लागलं. पण या वास्तवाचा झाहरानं या वास्तवाचा मोठ्या खंबीरपणे सामना केला. हे सर्व चालू असताना तिनं आपली नोकरी आणि नवऱ्याच्या व्यवसायात मदत करणं सुरुच ठेवलं. 
कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करताना पैसा लागतोच. पण सर्वात महत्वाची असते ती स्वत:ची आणि कुटुंबाची हिंमत, संयम, संवेदना आणि प्रेम, कुटुंबाने, व्यवसायातील सहकाऱ्यांनी केलेली मदत हे सर्व आपल्याला या लढाईत एका शस्त्रासारखं कामाला आल्याचं बाबर आपल्या पोस्टमध्ये लिहितात.  

Image: Google

एखाद्या गोष्टीकडे बघण्याच आपला दृष्टिकोन कसा आहे यावर  त्या गोष्टीचा आपल्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. कॅन्सरकडे सकारात्मक दृष्टीने बघितल्यास संकटातही जगणं कसं आनंदी होवू शकतं हे बाबर यांनी लिहिलेल्या पोस्टवरुन उमगतं. अशा पोस्ट वाचणाऱ्यांनाही जगण्याकडे बघण्याची नवी दृष्टी आणि हिंमत देतात हेच खरे!

Web Title: Man writes about how his wife fight with cancer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.