काही पारंपरिक पदार्थांमध्ये अशी मिठास असते की जगभर तिची चर्चा होतेच. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे मनेर का लड्डू! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या लाडूंची चव चाखून पाहिली आणि त्याचं भरभरून कौतूक केलं. त्यांच्याकडून लाडूंचं कौतूक ऐकून त्या दुकानासमोर तर लाडू खरेदीसाठी रांगा लागल्याच पण सोशल मिडियावरही पंतप्रधानांनी चाखून पाहिलेला हा लाडू कोणता म्हणून भरपूर शोधाशोध सुरू झाली. अर्थात हा लाडू काही काल- परवाचा नाही. ते बिहारमधलं एक पारंपरिक पक्वान्न (traditional sweet recipe of bihar). मनेर हे बिहारमधलं एक गाव. या गावात तयार होणारा हा खास लाडू. त्यामुळे 'मनेर का लड्डू' म्हणूनच तो भारतभर आणि आता तर परदेशातही ओळखला जातो. आजवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, अभिनेता आमीर खान आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या लाडवांची चव आवडली आहे. (prime minister narendra modi loves and appreciate maner ke laddu)
कसा तयार केला जातो मनेरचा लाडू?
बुंदीचे लाडू किंवा मोतीचूरचे लाडू ज्या प्रकारचे असतात, त्याचा प्रकारचा मनेरचा लाडू असतो. पण बुंदी किंवा मोतीचूरच्या लाडूमध्ये असलेला दाणा हा आकाराने बराच मोठा असतो. मनेरच्या लाडूमध्ये असणारा दाणा हा अगदी मोहरीच्या दाण्याएवढा किंवा त्यापेक्षाही कमी आकाराचा असतो.
डोकं सारखं ठणकतं? डॉक्टर सांगतात ५ गोष्टी, मायग्रेनचा त्रास कमी होऊन मिळेल आराम
हा लाडू तयार करण्यासाठी सगळ्यात आधी बेसन भिजवून त्याचे दाणे पाडून घेतले जातात. बुंदी जशी पाडली जाते, तशाच पद्धतीने हे काम केलं जातं. त्यानंतर त्यामध्ये भरपूर खवा, सुकामेवा, साजूक तूप, साखरेचा पाक असं सगळं टाकून त्याचे लाडू वळले जातात.
केस रंगवूनही महिनाभरातच पुन्हा पांढरे होतात? १ मस्त उपाय, किमान २ महिने केस राहतील काळेभोर
खवा, सुकामेवा आणि साजूक तूप हे पदार्थ या लाडूमध्ये अगदी सढळ हाताने टाकलेले असतात. शिवाय इतर लाडूंच्या तुलनेत साखर कमी प्रमाणात असते. त्यामुळे या लाडूची एक वेगळीच चव खवय्यांच्या जिभेवर रेंगाळत राहाते...
मनेर लाडूंचा आस्वाद घेणारे सेलिब्रिटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच मनेर लाडूंचा आस्वाद घेतला. पण त्यांच्यापुर्वी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही हे लाडू चाखून पाहिले होते आणि त्याचं भरभरून कौतूक केलं होतं.
अमीर खान, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटींनीही बिहारला गेल्यानंतर मनेर लाडूंची चव आवर्जून घेतलेलीच आहे म्हणे...