आजकाल विचित्र फूड कॉम्बिनेशन्सचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सकडून या चित्रविचित्र फूड कॉम्बिनेशन्सना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काही प्रयोगांचे कौतुक केले जात आहे. तर काहींना हास्यास्पद ठरवले जात आहे. फंटा मॅगी, मॅगी आईस्क्रीम असे अनेक प्रयोग इंस्टंट न्यूडल्स बनवताना केला जातात. मॅगी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच लोकप्रिय आहे. (Mango Maggie Viral Video)
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मँगो मॅगी न्यूडल्स लोकांना पचायला जड जात आहेत असं दिसून येतं. द ग्रेट इंडियन फूडीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला तव्यावर बटर घालून मॅगी आणि मसाला एकत्र करते. नंतर त्यात आंब्याचा रस आणि आंब्याचे काप घालते. सुरूवातीला हे पाहायला चांगलं वाटतं पण जसजसं ती त्यात आंबा घालते तेव्हा हा पदार्थ चवीला कसा लागत असावा याचा विचारही केला जाऊ शकत नाही.
सेक्स लाइफ बिघडवतात, संसारात विष कालवतात ५ लाइफस्टाइल चुका; बघा नक्की चुकतं काय?
इंस्टाग्रामवर व्हिडिओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 5,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 'कृपया हे ठिकाण कुठे आहे ते सांगा म्हणजे या महिलेला कोणीतरी जाऊन समजवेल.' अशी कमेंट एका युजरनं केली आहे.' मॅगी हा मसाला, झटपट सूप आणि नूडल्सचा एक लोकप्रिय बहुराष्ट्रीय ब्रँड आहे जो 1800 च्या उत्तरार्धात स्वित्झर्लंडमध्ये सुरू झाला. नेस्लेने ते 1947 मध्ये खरेदी केले. भारताव्यतिरिक्त, इन्स्टंट नूडल ब्रँड बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीवमध्ये लोकप्रिय आहे.