गुजरातचे भूषण असलेल्या पटोला साडीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. या साडीची एवढी चर्चा होण्याचं आणि पुन्हा एकदा ती साडी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi). नरेंद्र मोदी यांनी जी२० सभेला जाताना इंडोनेशियाच्या प्रधानमंत्री जॉर्जाया मेलोनी यांच्यासाठी ही साडी भेट म्हणून नेली होती. तेव्हापासून पटोला साडीची चर्चा होत असून त्यानिमित्ताने साडीची खासियत, नजाकत आणि तिच्यावरची पारंपरिक नक्षी या सगळ्याच गोष्टी पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. ११ व्या शतकापासून पटोला साडी (History and Beauty Of Patola Saree From Gujarat) अस्तित्वात असून अजूनही ती तिची मागणी टिकवून आहे.
पटोला साडीची खासियत
असं म्हणतात की ११ व्या शतकात पटोला साडी विणण्याची सुरुवात झाली. कुमार पाल या राजाने महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील ७०० विणकरांना पटोला साडी विणण्यासाठी पाटन येथे बोलावले.
त्यानंतर त्यापैकी बहुतांश विणकर तेथेच स्थायिक झाले आणि तेव्हापासून पाटन पटोलाची परंपरा सुरू झाली. पुर्वीच्या काळी फक्त राजघराण्यातील स्त्रियांसाठीच ही साडी विणली जायची. आजही ही साडी अतिशय महागडी असून अस्सल पटोला साडीच्या किमतीची सुरुवात अजूनही १ लाखाच्या पुढेच होते. यातल्या काही साड्यांचे प्रकार मात्र आता ५ ते ६ हजारांतही मिळत आहेत.
This family in Gujarat keeps 900-year-old heritage of Patola sarees alive
— ANI Digital (@ani_digital) November 25, 2022
Read @ANI Story | https://t.co/d5ROcyh3bV#Gujarat#PatolaSaree#PatolaHandloompic.twitter.com/fVNqvGtN7M
कशी तयार होते पटोला साडी?
गुजरातमधील काही विणकर कुटूंबांनी आजही पटोला साडीचे अस्तित्व कायम ठेवले आहे. यापैकीच एक असणारे रोहित साळवे यांनी सोशल मिडियावर दिलेल्या माहितीनुसार एक पटोला साडी विणण्यासाठी जवळपास ६ महिने लागतात.
त्वचेवर येईल ब्रायडल ग्लो... घ्या एक खास ज्यूस! दिसाल सुंदर आणि आरोग्यासाठीही फायदेशीर
४ ते ५ विणकरांना त्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते. या साडीसाठी लागणारे रॉ सिल्क ते बंगळूर येथून मागवतात आणि त्यानंतर जवळपास २० प्रकारच्या वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर ही साडी तयार होते. ४ ते ५ प्रमुख रंग या साडीसाठी वापरले जातात.