भारत आणि पाकिस्तान (India/Pakistan). फाळणीनंतर दोन देश वेगळे झाले. पण खाणंपिणं, संस्कृती, भाषा यामुळे इथली माणसं जोडलेली आहेत. स्थानिक संस्कृतीत अनेकदा या सांस्कृतिक खुणा दिसतात. देश वेगळे झाले तरी अजूनही भाषेचे आणि खाण्यापिण्याचे कनेक्ट तर आहेतच (Food Connection). त्याचंच एक उदाहरण म्हणजे सध्या खूप व्हायरल होत असलेला हा कराचीतील मराठी माणसाचा व्हिडिओ (Viral Video).
कराची बहूसांस्कृतिक, बहूभाषिक शहर. अजूनही कराचीत काही प्रमाणात मराठी बोलणारे लोक आहेत. ते गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करतात. आताचा हा व्हिडिओ मात्र कराचीत वडापाव विकणाऱ्या एका मराठी माणसाचा आहे(Marathi family in Pakistan found selling Vada Pav). तो अर्थातच मराठी छान बोलतो. पण मुख्य म्हणजे तो मुंबईचे स्ट्रीट फूड अर्थात वडापाव विकतो आहे. कराचीतही मुंबईकर वडापावचे चाहते अनेक आहेत त्यामुळे आता हा वडापाववालाही फेमस झाला आहे(Marathi Couple Selling Vada pav in Pakistan).
चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम
पाकिस्तानात मराठी माणूस विकतोय 'वडा पाव'
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतेय की एक मराठी कुटुंब आहे. हे कुटुंब कराचीमध्ये वडा पाव विकण्याचं काम करत आहे. परमेश जाधव, त्यांच्या पत्नी मधू आणि वहिनी शारदा हे तिघं मिळून भारतीय पदार्थांचा स्टॉल चालवतात. या स्टॉलवर ते वडापावसह व्हेजिटेबल नूडल्स, मोमोज, पाव भाजी, इडली सांबार आणि मसाला डोसा विकतात. पण त्यांच्या स्टॉलवर मुख्य गर्दी वडा पावमुळे जमते.
मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा
व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती
पाकिस्तानमधील मराठी कुटुंबाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर धीरज मानधनने शेअर केला. व्हिडिओमध्ये इन्फ्लुएंसर त्या व्यक्तीला 'मराठी माणूस पाकिस्तानात कसा?' असा प्रश्न विचारत आहे. त्यावर उत्तर देताना परमेश म्हणाले, 'मराठी माणूस कराचीमध्ये पहिल्यापासून आहे. अनेक पिढ्यांपासून. आता ७ महिन्यांपूर्वी आम्ही हा स्टॉल लावला. या स्टॉलचं नाव आम्ही 'वडा पाव - मसाला डोसा इन कराची' असं ठेवलं आहे.' कराचीचा मराठी वडापाव सध्या चांगलाच व्हायरल आहे.