फेसबुक आणि इंस्टाग्रामचे सीईओ मार्क झुकरबर्ग आजकाल टेलरिंग शिकत आहेत. मार्क ''गरज ही शोधाची जननी आहे" यावर विश्वास ठेवतात. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे 3D प्रिंटेड ड्रेसची छायाचित्रे शेअर केली आहेत जी त्यांनी आपल्या मुलीसाठी तयार केली आहेत.
पहिल्या फोटोत त्यांच्या मुलीने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चित्रात ड्रेसची रचना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मेटाच्या सीईओंने लिहिले की, ते थ्रीडी प्रिंटेड ड्रेस डिझाइन करायला शिकत आहेत आणि लवकरच शिवणकाम आणि विणकाम शिकणार आहे.
मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या इंस्टाग्राम चॅनलद्वारे सांगितले की, लवकरच दोन नवीन फीचर्स इंस्टाग्रामवर येणार आहेत. सध्या कंपनी त्यांची चाचणी घेत आहे. पहिले वैशिष्ट्य म्हणजे लोक नोट्सच्या स्वरूपात गाणी शेअर करू शकतील, दुसरे म्हणजे लोक एकापेक्षा जास्त फोटो असलेल्या पोस्टमध्ये गाणी जोडू शकतील. आतापर्यंत, अॅपवर फक्त एका फोटोसह गाणे पोस्टवर जोडले जाऊ शकते.
पोस्टला 219k पेक्षा जास्त लाईक्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. झुकरबर्गच्या नवीन छंदाबद्दल काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे तर अनेकांनी त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला चॅन यांनी 2015 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीला, मॅक्सिमाला जन्म दिला. 2017 मध्ये, त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्माची घोषणा केली.