प्रसिद्ध शेफ विकास खन्ना एअर इंडीयाच्या विमानात असतात आणि विमान हवेत कित्येक फूट वर उडत असताना ते असे काही करतात की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. विमानाच्या पँट्री एरीयामध्ये जाऊन ते अचानक केक डेकोरेट करायला लागतात. विमानात सेवेत असणारे कर्मचारी निवृत्त होत असल्याचे समजल्यानंतर ते पँट्रीमध्ये जाऊन केक डेकोरेट करायला घेतात. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की शेफ विमानाच्या पँट्री एरीयामध्ये केकवर लावण्यासाठी फळं कापत असतात. तसेच त्यांच्या बाजूला व्हीप्ड क्रीमचा कॅनही आपल्याला दिसतो (MasterChef Vikas Khanna Humility Gesture in Air India Flight) .
त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी विकास खन्ना अतिशय छान असे सरप्राईज देण्याचा प्लॅन करताना दिसतात. एअर इंडीया जेव्हा त्यांचा हा व्हिडिओ पाहते तेव्हा ते पुन्हा शेअर करतात आणि विकास खन्ना यांना टॅग करुन “रिस्पेक्ट आणि लव्ह अशी कॅप्शन देतात. तुमची नम्रता आणि औदार्य पाहून आम्ही खरंच खूश झालो आहोत, खूप मनापासून धन्यवाद.” ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा ३० सेकंदांचा व्हिडिओ काही दिवसांत ४७ हजार जणांनी पाहिला आहे.
Heart warming gesture of love by #Michelin#Masterchef@TheVikasKhanna on board @airindia to redo a special cake for a retiring Crew member
— Sanjay (@sjlazars) August 28, 2023
Chef Vikas is a Dariya dil,who fed 40 mill during Covid, but this was special🙏🏻❤️#avgeeks@RNTata2000@virsanghvi@advsanjoy@BLRAviationpic.twitter.com/AIbw8bAQvz
असंख्य जणांनी या व्हिडिओला लाईक केले असून बऱ्याच जणांनी विकास खन्ना यांच्याबद्दल रिस्पेक्ट दाखवणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या नम्रतेचे कौतुक केले आहे तर काहींनी त्यांच्या या वागण्याला हृदयस्पर्शी असे म्हटले आहे. विमानातील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी इतक्या मोठ्या मास्टर शेफने असे काही करणे हे खरेच कौतुकास्पद आहे.