Join us

इंग्रजीच्या शिक्षिकेला नाचताना पाहून गणिताच्या शिक्षकानंही धरला ठेका, पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 17:24 IST

१३ ऑक्टोबरला सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला १८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

शाळा, कॉलेजातील प्रसंग नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत राहणारे असतात. एखादा विनोदी प्रसंग कॅमेरात कैद झाल्यानंतर जेव्हा जेव्हा तो प्रसंग पाहिला जातो तेव्हा खूप  हसायला येतं.  शाळेतील शिक्षक, मित्र मैत्रिणी यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. (Math teacher could not control when english teacher dance watch video)

@papisociety नावाच्या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत दोन शिक्षक शाळेच्या कार्यक्रमात नाचताना दिसत आहे.   वास्तविक या व्हिडिओमध्ये सुरूवातीला इंग्रजी विषयाची शिक्षिका डान्स करत असते. ते पाहून जवळच उभ्या असलेल्या व्यक्तीला हुरूप येतो आणि  तो ही आनंदानं नाचायला लागतो. ही व्यक्ती गणिताचा शिक्षक असल्याचं समोर येतं.

यादरम्यान मुख्याध्यापिका त्यांना थांबण्याचा प्रयत्न करतात पण कोणीही ऐकत नाही. यावेळी त्या डोक्याला  हात लावून पुढे निघून जातात. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, गणिताच्या सरांनी इंग्रजीच्या शिक्षकांना बघितल्यानंतर, ही छोटी क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाही खूप हसायला येईल. 

जोडपं पहिल्यांदाच विमानात बसलं इंग्लिश जराही कळत नव्हतं, अनोळखी व्यक्तीनं केलं असं काही.....

१३ ऑक्टोबरला सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला १८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर डान्ससाठी गणिताच्या टिचरचं कौतुक केलं जात आहे. एका युजरनं 'भारतीय चीझे देखने को मिलीट अशी कमेंट केली आहे तर अनेकांनी हा व्हिडिओ गमतीदार असल्याचं म्हटलंय.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल