सोशल मीडियावर डान्स, गाण्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होतात. अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. इंस्टाग्राम युजर विनिता शर्मानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'लत लग गई' या गाण्यावर सुन डान्स करत आहे. याऊलट तिची सासू स्वयंपाकघरात जेवण बनवण्यात व्यस्त आहे. (Mather in law has the sweetest reaction after seeing her daughter in law dance)
सून नाचत असताना सासूच्या चेहऱ्यावर हसू फुलतं आणि ती तिच्याकडे पहते. नाचत नाचत ती महिला सासूजवळ जाते आणि तिलाही डान्स करण्यास सांगते. नंतर या दोघीही डान्स इन्जॉय करतात. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "सासू माँच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करा. मी स्वत:ला जशी आहे तशी स्विकारले, त्यांनीही मला मी जशी आहे तसं स्वीकराले. असे पालक आणि कुटुंब मिळाल्याबद्दल धन्यवाद.'
मानलं पोरा! लिंबू-चमचा शर्यतीत लेट धावला पण थेट पहिला आला, Video पाहा
हा व्हिडिओ शेअर केल्यापासून 63,000 वेळा लाईक करण्यात आले आहे आणि त्यावर अनेक कमेंट्सही आहेत. इंस्टाग्राम कमेंटमध्ये एका व्यक्तीने लिहिले, "व्वा, हे खूप छान आहे." दुसरी व्यक्ती पुढे म्हणाली, "मलाही तुझ्यासारखी सासू हवी आहे." "तुमचा आत्मविश्वास आवडला, खूप छान आहे!" इतर काहींनी हार्ट इमोजी वापरून प्रतिक्रिया दिली आहे.