Join us  

मतवाली ओ इंस्टाग्रामवाली.. सोशल मीडियात रमलेल्या सूनेसाठी सासूचे व्हायरल गाणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2023 3:23 PM

Mother-in-law's viral song for social media obsessed daughter-in-law : महिलांच्या भजन मंडळीत 'मतवाली ओ इंस्टाग्राम वाली, वो फोन रखे हाथ में' हे गाणं कोणाला उद्देशून आहे ऐकलं का ?

सासू - सुनेचे नाते म्हटले की, ते थोडे अजबच वाटते. हे नाते अतिनाजूक आणि अतिसंवेदनशील मानले जाते. कधी या एकमेकींना इतकं प्रेम करतील तर कधी  क्षणांत भांडायला लागतील. सासू - सुनेचे नाते म्हणजे केवळ ३६ चा आकडा किंवा सासू सुनांच्या भांडणावर कितीतरी जोक्स तयार होतात जे आपल्याला पोट धरून हसवतात. सासू - सून या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी सासू आपल्या मैत्रिणींना सुनेबद्दल तक्रार करते तर कधी सून आपल्या जवळच्या व्यक्तींना सासूचे पराक्रम सांगते. अशा प्रकारे थोड्या कडू - गोड आठवणी सोबतीला घेत हे नाते पुढे जात असते. काही सासवांच्या सुना या मॉडर्न जमान्याच्या असतात. त्या मोबाईलवर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या असतात. कधी कधी तर या सुना घरातील काम करायची सोडून तासंतास सोशल मीडियावर घालवतात. अशाच प्रकारच्या सुनांना उद्देशून या महिलांनी एक गाणं तयार केलं आहे. काय आहे ते गाणं... त्या गाण्याचे बोल नक्की काय सांगतात... हे पाहूयात (Mother-in-law's viral song for social media obsessed daughter-in-law).  

नक्की काय आहे या व्हिडिओत ते  पाहु... 

renu.club या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये, भजन मंडळीतील काही महिला एकत्र बसून ढोलकच्या तालावर मग्न होऊन गाणं गाताना दिसत आहेत. या महिला १९६८ सालच्या 'राजा और रंक' या हिंदी चित्रपटातील 'ओ फिरकीवाली तु कल फिर आना' या गाण्याच्या तालावर एक नवीन गाणं गात आहेत. 'ओ फिरकीवाली तु कल फिर आना' या गाण्याची चाल घेऊन त्यात 'मतवाली ओ इंस्टाग्राम वाली, वो फोन रखे हाथ में' असे बोल सुनेला उद्देशून केले आहेत. हे बघून सोशल मीडियावर नेटकरी फार पोट धरून हसत आहे. 

नेटकरी काय म्हणत आहेत.... 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याला काही तासांतच ६ मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. २ लाखांपेक्षा अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी यावर पोट धरून हसविणाऱ्या कमेंट्स करत आहेत. 'असं तर सत्य कटू असत असं म्हणतात... पण हे सत्य गोड मधुर आहे' अशी कमेंट एका युजरने केली आहे. 'खूप सुंदर गीत', सुंदर...अतिसुंदर गीत' अशा अनेक कमेंट्स युजर्सने केल्या आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरल