Lokmat Sakhi >Social Viral > पत्नी स्वप्नात येऊन छातीवर बसते, रोज छळते! कॉन्स्टेबलचं स्पष्टीकरण वाचून अधिकारी 'कोमात'..

पत्नी स्वप्नात येऊन छातीवर बसते, रोज छळते! कॉन्स्टेबलचं स्पष्टीकरण वाचून अधिकारी 'कोमात'..

Viral News : बेशिस्तपणा आणि बेजबाबदार वागणं याबाबत अधिकाऱ्यांनी त्याला स्पष्टीकरण मागितलं होतं. त्याचं उत्तर देताना त्यानं हा अजब दावा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:43 IST2025-03-06T14:43:09+5:302025-03-06T14:43:44+5:30

Viral News : बेशिस्तपणा आणि बेजबाबदार वागणं याबाबत अधिकाऱ्यांनी त्याला स्पष्टीकरण मागितलं होतं. त्याचं उत्तर देताना त्यानं हा अजब दावा केला.

Meerut army commander told that his wife comes in his dream and torture him | पत्नी स्वप्नात येऊन छातीवर बसते, रोज छळते! कॉन्स्टेबलचं स्पष्टीकरण वाचून अधिकारी 'कोमात'..

पत्नी स्वप्नात येऊन छातीवर बसते, रोज छळते! कॉन्स्टेबलचं स्पष्टीकरण वाचून अधिकारी 'कोमात'..

Viral News : स्वप्नात लोकांना वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. काहींना चांगली रोमॅंटिक स्वप्न दिसतात, काहींना वेगळ्या विश्वाची तर काहींना भीतीदायक स्वप्ने दिसतात. स्वप्नात वेगवेगळे लोकही दिसू शकतात. ते मृतही असून शकतात किंवा जिवंतही असू शकतात. यात वेगळं असं काही नाही. पण सध्या एका व्यक्तीच्या अशाच स्वप्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पत्नी स्वप्नात येते आणि छाताडावर बसून रक्त पिते, छळते... असं स्पष्टीकरण मेरठमधील सशस्त्र दलाच्या एका कॉन्स्टेबलनं अधिकाऱ्यांकडे दिलं आहे. बेशिस्तपणा आणि बेजबाबदार वागणं याबाबत अधिकाऱ्यांनी त्याला स्पष्टीकरण मागितलं होतं. त्याचं उत्तर देताना त्यानं हा अजब दावा केला.

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील PAC च्या या कॉन्स्टेबलची सध्या चांगली चर्चा रंगली आहे. कारण त्यानं केलेल्या दाव्यानं त्याचे अधिकारीही हैराण झाले आहेत. त्यानं स्पष्टीकरण देताना सांगितलं की, 'माझ्या पत्नीसोबत माझा वाद सुरू आहे. ती घरी राहत नाही. पण तरी सुद्धा ती माझ्या स्वप्नात येते. छातीवर बसते आणि माझं रक्त पिते. त्यामुळे मी माझ्या कामावर आणि स्वत:वर फोकस करू शकत नाहीये'.

मीडिया रिपोर्टनुसार, कॉन्स्टेबल बऱ्याच दिवसांपासून ऑफिसमधील कामात व्यवस्थित लक्ष घालत नव्हता. वेळेवर ऑफिसलाही येत नव्हता. इतकंच नाही तर गणवेशही व्यवस्थित घालून येत नव्हता. दाढी-कटींगही करत नव्हता. याबाबत त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला स्पष्टीकरण मागितलं. त्यानंतर त्यानं जे स्पष्टीकरण दिलं ते वाचून तेही हैराण झाले. इतकंच नाही तर त्यानं सांगितलं की, तो जीवनाला कंटाळला असून त्याला देवाच्या चरणी जायचं आहे.

महत्वाची बाब म्हणजे कॉन्स्टेबलनं दिलेल्या स्पष्टीकरणाचा फोटोही व्हायरल झाला आहे. जेव्हा प्रसार माध्यमांनी अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं तर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. व्हायरल झालेल्या फोटोनुसार, कॉन्स्टेबलचा पत्नीसोबत वाद सुरू आहे. ती त्याच्या स्वप्नात येऊन छातीवर बसते आणि त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे तो रात्री झोपूही शकत नाही. त्यामुळे तो वेळेवर ऑफिसला पोहोचू शकत नाही. त्यानं सांगितलं की, तो डिप्रेशनचं औषध घेतोय आणि त्याची आईची तब्येतही बरी नाही. त्यानं देवाच्या चरणी जाण्याचा मार्ग विचारला, जेणेकरून तो त्रासातून मुक्त होईल.

अधिकारी काय म्हणाले?

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कॉन्स्टेबलचं स्पष्टीकरण व्हायरल झालं आहे. त्याची चौकशी सुरू आहे. कोणता स्टाफ आहे आणि त्याची अडचण काय आहे, याची चौकशी केली जात आहे. जर त्याला काही गरज असेल तर त्याचं काउन्सेलिंग केलं जाईल. जर त्याला विभागीय मदतीची गरज लागली तर त्यावरही काम केलं जाईल.

Web Title: Meerut army commander told that his wife comes in his dream and torture him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.