काही तरी नवीन गोष्टी करण्याच्या नादात लोकं काहीतरी भलतंच करून बसतात. सुंदर आणि परफेक्ट दिसण्यासाठी अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करतात हे आपण ऐकलंच असेल. पण कधी एका महिलेने मोठ्या ओठांसाठी साजरी केल्याचं ऐकिवात आहात का? बुल्गारियात राहणाऱ्या एका महिलेने मोठ्या ओठांच्या नादात अशी काही सर्जरी केली, की तिच्या ओठांचा नक्षाच पूर्णपणे बदलून गेला आहे (Social Viral).
जगातील सर्वात मोठे ओठ मिळविण्यासाठी तिने अनेकदा शस्त्रक्रिया केल्या आहेत. परंतु तरीही ती समाधानी नाही. जगातील सर्वात मोठी ओठ असलेली महिला म्हणून ओळख मिळावी यासाठी तिने काय केलं पाहा(Meet a Woman Who Has the Biggest Lips in the World).
मोठ्या ओठांची अजब गोष्ट
आजकाल सुंदर दिसण्यासाठी लोकं कोणत्याही थराला जातात. शिवाय आपले असे काही हाल करवून घेतात, की ज्यामुळे आपल्या चेहऱ्याचा संपूर्ण नक्षास बदलून जातो. बुल्गारियात राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेने असाच काहीसा पराक्रम आपल्या ओठांसोबत केला आहे. एंड्रिया इव्हानोव्हा असे त्या महिलेचे नाव असून, ती जगातील सर्वात 'बिग्गेस्ट लिप्स' म्हणून तिची ओळख झाली आहे.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही कुबट वास येतो? ४ टिप्स, कपडे चकाचक, दुर्गंध गायब
अँड्रिया इव्हानोव्हा दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने तिच्या ओठांमध्ये फिलर्स लावते. अशा परिस्थितीत यंदाही इवानोव्हाने ख्रिसमस गिफ्ट म्हणून स्वत:साठी लिप फिलर्स खरेदी केले आहेत. द मिररच्या रिपोर्टनुसार, या बुल्गारियेन महिलेने आतापर्यंत तिच्या ओठांवर वीस लाख रुपये खर्च केले आहेत. ओठांव्यतिरिक्त तिला आता जगातील सर्वात मोठे गाल असलेली महिला बनायचे आहे.
ओठांबद्दल कुटुंबियांना काळजी..
एका मुलाखतीत अँड्रिया सांगते, 'माझ्या कुटुंबियांना हा बदल आवडलेला नाही. त्यांना वाटतं की मी यात खूप वाईट दिसते. पण माझा हा लूक मला खूप आवडतो. त्यांना असं वाटतं की यामुळे माझ्यासोबत खूप वाईट काहीतरी घडेल. आणि या गोष्टींमुळे भविष्यात मला घातक परिणामही भोगावे लागतील. पण असं काही होणार नाही.'
थर्टी फस्ट घरीच साजरा करणार? ६ आयडिया, सेलिब्रेशन होईल यादगार, पार्टी होईल जबरदस्त
ती पुढे म्हणते, 'नाताळनिमित्त मी पुन्हा ओठांवर फिलर्स लावले. हे पाहून माझ्या घरचे घाबरले. पण पुढील वर्षी मी चेहरा अधिक फिलर्सने वाढवणार आहे. मी आता मोठी आहे आणि मला माझ्या शरीराचे काय करायचे आहे, हे चांगलंच ठाऊक आहे. दरवर्षी मी माझ्यासाठी नवीन फिलर्सची भेटवस्तू म्हणून स्वतःला देते.'