Join us  

ममता कुलकर्णीच्या सिनेमात एकेकाळी ‘ती’ बॅकडान्सर होती, आता आहे दिलजीत दोसांझच्या सिनेमातली सुपरस्टार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 8:06 PM

Meet Diljit Dosanjh's actress, who started as background dancer in Mamta Kulkarni's film, then became superstar, now.. : तिचा त्यावेळचा फोटो पाहिला तर विश्वासही ठेवता येणार नाही की तिने बॅक डान्सर ते सुपरस्टार असा प्रवास केलाय.

हिंदी सिनेमातले हिरो हिरॉइन तर आपल्या लक्षात राहतात (Neeru Bajwa). पण साईड आर्टिस्ट? ते आयुष्यभरासाठी फक्त तेच काम करतात. बॅक डान्सर म्हणून नाचणारे तर कितीतरीजण असतात (Actress). नव्वदच्या दशकात तर हिरो हिरॉइनच्या मागे शे दिडशे डान्सर्स नाचत. पण त्यांचे चेहरे आठवावे किंवा त्यांचं पुढे काय होतं याची काळजी कोण करतं. पण त्यातले काही मात्र बॅक डान्सर किंवा साइड आर्टिस्ट (Side Artist) म्हणून काम करता करता मिळालेल्या संधीचं सोनं करतात आणि पुढे हिरो हिरॉइनही होतात (Struggle).

ही गोष्ट कोणेएकेकाळी ममता कुलकर्णीच्या गाण्यात बॅक डान्सर म्हणून काम करणाऱ्या एकीची. पुढे तिने सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं. आता तर दिलजीत दोसांझसोबतच्या सिनेमाचीही चर्चा आहे(Meet Diljit Dosanjh's actress, who started as background dancer in Mamta Kulkarni's film, then became superstar, now..).

पंजाबी चित्रपटातील सुप्रसिद्ध चेहरा अभिनेत्री नीरू बाजवा. तिचं नाव. तिने सिनेसृष्टीत अनेक खस्ता खाल्लया, पण सिनेसृष्टीत नाव कमावलं. एकेकाळी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या चित्रपटात साईड आर्टिस्ट म्हणूनही नीरुने  काम केलं. स्ट्रगलचा तो काळ. पण पुढे आपला अभिनयाच्या आणि मेहनतीच्या जोरावर तिने स्वत:चं स्थान निर्माण केलं. काळाच्या ओघात ममता कुलकर्णीने फिल्मी दुनियेला रामराम ठोकला, पण नीरुने मात्र कारकीर्द गाजवली.

नीरु बाजवा नक्की कोण?

१. नीरु बाजवा ही एक पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

२. मूळची कॅनडाची असलेली नीरु बाजवा. तिने आपलं शिक्षण कॅनडात पूर्ण केलं. इतर करिअरपेक्षा अभिनयाच्या जगात नाव कमवण्यात तिला जास्त रस होता.

३. नीरुला पहिली चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी, १९९८ साली मिळाली. 'मैं सोलाह बरस की' या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने टीव्ही, म्युझिक अल्बमसह फिल्मी दुनियेतही विशेष ठसा उमटवला.

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय

४. नीरुनं २०१५ साली हॅरी जवंधाशी लग्न केलं. यापूर्वी तिचं नाव प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अमित साध यांच्याशी जोडलं गेलं होतं. नीरु आता तीन मुलींची आई आहे.

५. नीरु, लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती आणि दिग्दर्शिका देखील आहे.

टॅग्स :ममता कुलकर्णीसोशल व्हायरलदिलजीत दोसांझ