Join us  

अडीच वर्षाची असताना हरवलं वडिलांचं छत्र, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सैन्यात दाखल, इनायतने घेतले देशसेवेचे व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 12:33 PM

Meet Lt. Inayat Vats, Joining Army 20 Years After Father's Sacrifice For India : पती दहशदवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद, पण बायकोने हार नाही मानली, तिने इनायतला घडवलं..

बाप-लेकीचं नातं सर्वाना सर्वश्रुत आहे. बाप लेकीसाठी आणि लेक बापासाठी खूप खास असते. बापाचे नाव मोठं करण्यासाठी लेकी झटत असतात. शिवाय काही मुली आपल्या वडिलांचा कामाचा वारसा पुढे नेतात, आणि अशाच एका मुलीची चर्चा सर्वत्र होत आहे (Inayat Vats). अवघ्या अडीच वर्ष वय असताना एका चिमुकलीने तिच्या वडिलांना गमावलं. तिच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपलं (Army).

तिचे वडील २००३ मध्ये एका मिलिट्री ऑपरेशनवेळी शहीद झाले होते. आता याच चिमुकलीने मोठे होऊन वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवलं असून, ती लवकरच सैन्यात सामील होणार आहे(Meet Lt. Inayat Vats, Joining Army 20 Years After Father's Sacrifice For India).

बापाचं छत्र हरपलं, पण हार मानली नाही..

सेनेत भरती होणाऱ्या मुलीचे नाव इनायत वत्स असे असून, वडिलांप्रमाणे ती देखील सेनेत सामील होणार आहे. इनायतच्या वडिलांप्रमाणे तिचे आजोबाही लष्कारात कर्नल म्हणून तैनात होते. आता इनायत भारतीय सेनेत सामिल होणार असून, तिच्या कुटुंबीयांतील ही तिसरी पिढी देशसेवेसाठी सेनेत सामील होणार आहे. एप्रिल महिन्यात ऑफिस ट्रेनिंग अॅकॅडमी चेन्नईमध्ये रुजू होईल. इथे इनायतचं प्री-कमिशन बेस प्रशिक्षण असेल.

कपड्यांवरुन लोक तुमच्यावर शिक्के मारणार असतील तर..! रकुल प्रीत सिंग म्हणते, विचार केला तर..

इनायतचे वडील चकमकीत झाले शहीद

इनायत वत्स ही मेजर नवनीत वत्स यांची एकुलती एक मुलगी आहे. २००३ साली श्रीनगरमध्ये एका अँटी टेरर ऑपरेशनवेळी दहशदवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यानंतर त्यांना मरणोत्तर सेना पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं.

रोबोटने म्हणे महिला पत्रकारसोबत केलं आक्षेपार्ह कृत्य? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले..

इनायतचे वडील जेव्हा शहीद झाले, तेव्हा इनायतची आई शिवानी वत्स या केवळ २७ वर्षांच्या होत्या. अगदी लहान वयात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण त्यांनी हार नाही मानली. त्यांनी मुलीला उत्तम शिक्षण दिलं. इनायतने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. शिवाय ती सध्या हिंदू कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. देशाप्रती असलेलं प्रेम आणि वडिलांचा वारसा पुढे नेणाऱ्या या मुलीचे इंटरनेटवर भरभरून कौतुक करण्यात येत आहे. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल