फक्त लग्नच नसून, प्रत्येक सणाला महिलावर्ग हातावर मेहेंदी काढतात (Mehendi Designs). सध्या मेहेंदीचे अनेक डिझाईन्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण आपल्याला एक्स्पर्टप्रमाणे मेहेंदी काढायला जमत नाही (Trendy Designs). मेहेंदी डिझाईन चुकतात. ज्यामुळे हवी तशी मनासारखी डिझाईन येत नाही.
अशावेळी इच्छा असूनही मेहेंदी दुसऱ्यांना दाखवण्याची इच्छा होत नाही. जर आपल्यालाही मेहेंदी काढायला जमत नसेल, तर काही सोप्या डिझाईन्स पाहा. आकर्षक ट्रेण्डी पद्धतीचे डिझाईन आपल्या तळहातावर सुंदर दिसतील. शिवाय हे डिझाईन काढणंही सोपं आहे(Mehndi Designs for Raksha Bandhan 2024).
हँड फ्लॉवर मेहंदी डिझाइन
आजकाल मेहंदीचे इतके प्रकार आहेत की हातावर दागिने किंवा बांगड्या घालण्याची गरजच पडत नाही. जर आपल्याला सोपी आणि हटके डिझाईन हवी असेल तर, हँड फ्लॉवर मेहंदी डिझाइन काढा. लहान सुंदर सुबक फुलांची डिझाईन हातावर सुंदर दिसतील.
वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..
दोन हंसांची मेहंदी
जर आपल्याला रेखीव मेहेंदी डिझाईन हवी असेल तर, दोन हंस काढा, व त्याच्या भोवतीने डिझाईन काढा. दोन हंसाची जोडी तळहातावर सुंदर दिसेल. शिवाय त्याच्याभोवतीने कमळाची डिझाईन आकर्षक दिसेल.
मिरर रिफ्लेक्शन मेहेंदी डिझाइन
मिरर रिफ्लेक्शन मेहेंदी डिझाइनमध्ये, दोन्ही हातांवर समान डिझाइन लावली जाते, फरक एवढाच आहे की ते एकमेकांचे प्रतिबिंब म्हणून दिसतात. ही डिझाईन हातावर आकर्षक दिसते. आपण यात अनेक प्रकारचे डिझाईन काढू शकता.
वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय
3D मेहेंदी डिझाइन
आजकाल 3D मेहेंदी डिझाइनचा ट्रेण्ड सुरु आहे. यामध्ये जाड आणि बारीक रेखीव डिझाईन काढली जाते. जेणेकरून ही डिझाईन दिसण्यात आकर्षक आणि 3D दिसते. आपण आपल्या तळहातावर कोणत्याही प्रकारची 3D डिझाईन काढू शकता.