सध्याचा जमाना हा हटके कंटेंटचा आहे. व्हायरल फोटो अथवा व्हिडिओमध्ये जरा काही वेगळं पाहायला मिळालं, की त्या कंटेंटमध्ये असलेला व्यक्ती व्हायरल झालाच म्हणून समजा. सोशल मिडीयावर लोकं इतके सक्रीय झाले आहेत की, झपाट्याने त्यांची ओळख वाढत जाते. घरातील छोटेखानी कार्यक्रम असो या बिग बजेट फंक्शन त्यात कोणीतरी हटके डान्स केला असेल तर तो व्यक्ती व्हायरल होतोच. एका रीलमुळे व्यक्तीची रातोरात फोलोईंग वाढते. सध्या एका विवाहित महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये साधी, भोळी आणि सोज्वळ महिला असं काही रूप धारण करते ते पाहून सगळेच अवाक झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये एक महिला बेभान नाचताना दिसून येत आहे. काहीही विशेष मेहनत न घेता निव्वळ नैसर्गिकरित्या दिलेल्या हावभाभावांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ''मेरे हसबंड मुझको प्यार नहीं करते'' या गाण्यावर ही महिला नाचू लागते, आणि तिचा चेहरा प्रत्येक सेकंदाला अशी काही जादू करू लागतो की तुम्हालाही नजर काढून घेणं कठीण होईल.
या महिलेने सहज नाचताना तिच्या कुटुंबातील सदस्याने हा व्हिडीओ शूट केला होता. साडी नेसून अगदी छान खांद्यावर पदर घेऊन नाचताना ही महिला कडक हावभाव देत आहे. @abhinavBebaak या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करून लाईकचा पाउस पाडला आहे.