Join us  

Met Gala 2021: सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांची दुनिया, कधी यलो ऑम्लेट तर कधी काळे भयानक भूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 5:51 PM

न्यूयॉर्क शहरात होणारा Met Gala इव्हेंट म्हणजे फॅशन जगतातला जणू कुंभमेळाच. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे जबरदस्त गाजला.

ठळक मुद्देMet Gala इव्हेंट म्हणजे कपडे, हेअरस्टाईल आणि मेकअप यांची अशीच विचित्र दुनिया.  

यावर्षी नुकताच हा सोहळा न्यूयॉर्क शहराच्या मेट्रोपोलिटन म्युझिअम ऑफ आर्ट याठिकाणी पार पडला. सोहळा होताच सोशल मिडियावर या सोहळ्यातील आश्चर्यकारक गोष्टींची चर्चा जबरदस्त व्हायरल होत आहे. यामध्ये यावर्षी सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती अभिनेत्री किम कर्दाशियन हिने केलेल्या काळ्या कुट्ट पेहरावाची. कपड्यांबाबत अशी अतरंगी कल्पना तिला सुचलीच कशी, असा प्रश्न विचारून तिला अता नेटीझन्सकडून जबरदस्त ट्रोल केले जात आहे. किमचे विचित्र कपडे पाहून जगभरातल्या लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत आणि या कपड्यांमधून किम कोणते सौंदर्य दाखवू पाहत आहे, असा प्रश्नही नेटिझन्सने तिला विचारला आहे.

 

Met Gala इव्हेंट नेमका आहे तरी काय Met Gala इव्हेंट म्हणजे कपडे, हेअरस्टाईल आणि मेकअप यांची अशीच विचित्र दुनिया.  क्रिकेटमध्ये जसे  वर्ल्डकप महत्त्वाचे, धार्मिक विधींमध्ये कुंभमेळा महत्त्वाचा, पुरस्कारांमध्ये ऑस्कर महत्वाचा, तसेच सौंदर्य जगत तसेच फॅशन जगातात Met Gala सोहळा महत्त्वाचा. त्यामुळे एवढ्या मोठ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटी जय्यत तयारी करतात आणि या सोहळ्यात अवतरतात. या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर त्यांची चर्चा जगभर होते. संगीत, चित्रपट, फॅशन, मॉडेलिंग या क्षेत्रातील प्रसिद्ध लोक या सोहळ्यात सहभागी होत असतात. १९४६ पासून या सोहळ्याची सुरुवात झाली. दरवर्षी या इव्हेंटसाठी एक थीम ठरवून दिली जाते. या थीमनुसारच सेलिब्रिटींना त्यांचे कपडे, मेकअप, हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टी ठरवायच्या असतात. Met Gala 2021 साठी “American Independence” ही थीम ठरविण्यात आली होती. या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी कोट्यावधी रूपये मोजावे लागतात. 

 

किम कर्दाशियनचा काळा पेहरावअभिनेत्री किम कर्दाशियन या सोहळ्यात येताच अनेक कॅमेरे पटापट तिच्यावर सरसावले. पण तिने मात्र सुरुवातीला सगळ्यांचीच निराशा केली. बॅटमॅनसारखे काळे कपडे, काळे बूट घालून किम या सोहळ्यासाठी आली होती. तिने काळ्या कपड्याने तिचा चेहरादेखील झाकून टाकला होता. फक्त तिचा पोनीटेल मात्र सगळ्यांना दिसेल असा न झाकता उघडा ठेवण्यात आला होता. fetish-inspired outfit असे या ड्रेसचे नाव असून तो तिचा ex-husband कान्ये वेस्ट याने डिझाईन केला होता, असे सांगण्यात येते. लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये एखादे ॲनिमेटेड नकारात्मक पात्र असावे, अशी दिसत होती किम. 

 

या भारतीय अभिनेत्रीही झाल्या होत्या ट्रोलप्रियांका चोप्रा, दिपिका पदुकोन या अभिनेत्रीही या सोहळ्यात काही वर्षांपुर्वी सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनीही असेच विचित्र पेहराव केले होते. प्रियांका तिच्या नवऱ्यासोबत या साेहळ्यात सहभागी झाली होती. यामध्ये प्रियांकाने चंदेरी रंगाचा ड्रेस घातला होता. भुवयांना पांढरा रंग दिला होता आणि अतिशय विचित्र हेअरस्टाईल केली होती. तसेच दिपिका पदुकोन हिने गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता. तिचीही वेशभुषा आणि हेअरस्टाईल दोन्हीही नेटीझन्सला अजिबात आवडल्या नाहीत. या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर पुढचे कित्येक दिवस त्या  दोघी जबरदस्त ट्रोल होत होत्या. 

 

यलो ऑम्लेटची जबरदस्त चर्चा२०१५ साली झालेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये पॉप स्टार रिहानाने यलो केप गाऊन घातला होता. हा ड्रेस तब्बल २५ किलो वजनाचा होता आणि चक्क १६ फुट लांब होता. ती पुढे आणि तिचा भला मोठा गाऊन मागे, अशा थाटात रिहाना त्यावेळी या सोहळ्यात अवतरली होती. या गाऊनचा रंग पिवळा होता आणि तो दिसायला अतिशय फुगीर होता. त्यामुळे नेटिझन्सला तिचा हा ड्रेस पाहून ऑम्लेटची आठवण आली आणि त्यांनी या ड्रेसला यलो ऑम्लेट ड्रेस असे नाव देऊन टाकले होते.  

 

टॅग्स :सोशल व्हायरलकिम कार्देशियनमेट गालाफॅशनसेलिब्रिटी