Join us  

लय भारी! लहान पोराला सोडण्यासाठी मेट्रो आली थेट घरी; व्हिडिओ पाहा, खरंच नाही वाटणार..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 11:01 AM

Metro dropping boy directly inside home : पोस्ट केल्यानंतर या व्हिडिओला ६.६ मिलियन पेक्षा अधिकवेळा पाहण्यात आलंय आणि ४५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 

लोकल ट्रेन, मेट्रो यामुळे आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर पार करू शकतो.  दिवसेंदिवस या सेवा अधिक तत्पर होताना दिसत आहेत. एका लहान मुलाला थेट त्याच्या घरापर्यंत सोडणाऱ्या मेट्रोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही क्लिप शुक्रवारी तनसु येगेनद्वारे ट्विटरवर शेअर करण्यात आली. (Metro dropping boy directly inside home divides the internet says this is future see viral video)

पोस्ट केल्यानंतर या व्हिडिओला ६.६ मिलियन पेक्षा अधिकवेळा पाहण्यात आलंय आणि ४५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक महिला घरी बसून मोबाईल फोनचा वापर करत आहे.  काहीवेळानंतर अपार्टमेंटच्या फरशीचा एक भाग उघडतो आणि मेट्रो ट्रक बाहेर येतो.  मेट्रोसारखी रचना असलेली ट्रेन दिसते आणि अपार्टमेंटमध्ये येऊन उघडते. 

व्हिडिओ शेअर केल्यानंतर ट्विटर युजर्सनं कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या उपक्रमांचे कौतुक केले आहे. एका युजरनं लिहिलंय मी खरोखरच एक स्वप्न पाहत आहे. मी जे काही पाहत आहे ते अजिबात खरं वाटत नाही असंही एकानं म्हटलंय. भविष्यात अशी ट्रेन नक्कीच असित्वात असेल असं काहीचं म्हणणं आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया