आजकाल अनेक पदार्थ गरम करण्यासाठी आपण मायक्रावेव्ह वापरतो. त्यामुळे बऱ्याचदा घाई गडबडीत ठेवताना किंवा काढताना एखादा पदार्थ त्यामध्ये सांडतो. सांडलेला पदार्थ लगेचच स्वच्छ करणं झालं नाही तर मग त्याचे डाग तसेच राहून जातात (How to get rid of odour from microwave?). असं वारंवार होत गेलं तर मायक्रोवेव्ह डागाळलेलं दिसतं आणि बऱ्याचदा तर त्यातून कुबट वास येतो (Microwave cleaning hack). अशा मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ गरम करायला खूपच अस्वच्छ वाटतं (How to clean microwave from inside). म्हणूनच आता मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्याचा हा एक अगदी सोपा उपाय पाहून घ्या.(simple tips and tricks for cleaning microwave)
मायक्रोवेव्हची स्वच्छता कशी करायची?
मोजक्या ४ ते ५ मिनिटांमध्ये मायक्रोवेव्हची स्वच्छता कशी करायची, याचा उपाय sandtproducts या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
स्वयंपाक घरात खूप पसारा दिसतो- सामान ठेवायला जागाच नाही? बघा ३ पर्याय- पसारा होईल गायब
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लिंबू, व्हिनेगर आणि पाणी असे मोजकेच पदार्थ लागणार आहेत.
सगळ्यात आधी तर मायक्रोवेव्हमध्ये चालणारे कोणतेही भांडे घ्या. या भांड्यात एक कप पाणी टाका.
यानंतर २ लिंबू घ्या. त्याच्या गोलाकार चकत्या करा. त्या चकत्या भांड्यातल्या पाण्यात टाका.
त्या पाण्यात आता १ कप व्हाईट व्हिनेगर टाका आणि हे भांडे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्या. त्यावर झाकन ठेवू नका. २ ते ३ मिनिटांसाठी गरम करून घ्या.
जेव्हा आपण ते पाणी तापवू तेव्हा त्याच्या वाफा मायक्रोवेव्हच्या आतील भागामध्ये पसरल्या जातील.
कडिपत्त्याचं झाड वाढेल भराभर, फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या- कडिपत्ता कधीच सुकणार नाही
आता २ ते ३ मिनिटे झाली की ते भांडे मायक्रावेव्हच्या बाहेर काढा. आणि एखाद्या कपड्याने मायक्रोवेव्हची आतली बाजू पुसून घ्या. डाग निघाले नाही तर भांड्यातले लिंबाचे आणि व्हिनेगरचे पाणी डागांवर शिंपडा आणि पुन्हा डाग पुसून घ्या.
हा उपाय केल्याने डाग तर स्वच्छ होतीलच पण लिंबू आणि व्हिनेगर यांचा एकत्रित परिणाम होऊन मायक्रोवेव्हमधून येणारा कुबट वासही निघून जाईल.