बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा दिसतात. त्याचबरोबर त्यांची बोलण्याची पद्धत आणि शैली लोकांच्या मनाला भिडते. बरेच लोक त्यांची कॉपी देखील करतात. अनेकदा काही डिजिटल निर्माते बॉलीवूड स्टार्सची नक्कल करतात आणि त्यांची स्टाइल कॉपी करण्याचाही प्रयत्न करतात, ज्यांचे व्हिडिओ रोज समोर येत असतात. (Social Viral) नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला चित्रपट अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांची नक्कल करताना दिसत आहे. (Mimicry video of jaya bachchan goes viral woman does perfect mimicry of indian actress and politician jaya bachchan)
डिजिटल क्रिएटर अनाली सेरेजोनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती जया बच्चनची नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडीओची गंमत म्हणजे, अन्नाली यात जया बच्चनचा उच्चार कॉपी करताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंत केले जात आहे. व्हिडिओमध्ये ती महिला जया बच्चन यांच्या फॅन्ससोबतच्या संभाषणाची नक्कल करताना दिसत आहे, जी लोकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहे.
जया बच्चनचा हा मिमिक्री व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये अन्नाली सेरेजो जया बच्चनची नक्कल करताना दिसत आहे. तसे, जया बच्चन यांनी फॅन्ससोबत केलेल्या संभाषणाची इंटरनेटवर दररोज खूप चर्चा होते. त्यांच्या संभाषणाचे अनेक व्हिडिओ अनेकदा समोर येतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मजेदार व्हिडिओ शेअर करत, 'फक्त हसण्यासाठी' असे कॅप्शन लिहिले आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर एकापेक्षा एक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही खऱ्या जया बच्चन प्रमाणेच वाटता.'