मिसळ - पाव आणि पिझ्झा हे दोन असे पदार्थ आहेत की त्यांचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटत. फरसाण, कांदा, कोथिंबीर भुरभुरवलेली गरमागरम मिसळ आणि त्यासोबत पाव हे एक अनोखं कॉम्बिनेशन आहे. मिसळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती मिसळ सोबत दिली जाणारी तर्री आणि पाव. मिसळला खरी चव येते ती त्यासोबत दिल्या जाणाऱ्या तर्री, फरसाण आणि कांद्यामुळेच. फरसाण, मसालेदार तर्री, बारीक चिरलेला कांदा,लिंबाची फोड याशिवाय मिसळ पूर्णच होऊ शकत नाही. तसेच पिझ्झाचे आहे. भरपूरसाऱ्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस, क्रिमी चीज घालून खरपूस भाजलेला पिझ्झा पाहताच तो खाण्याचा मोह आवरला जात नाही. पिझ्झा बनवताना वापरलेले सॉस, चीज यांच्या क्रिमी टेस्टमुळेच पिझ्झा खायची मज्जा येते(How To Make Misal Pizza).
आपल्याकडील प्रत्येक एका पदार्थाचे विशेष असे महत्व असते. अमुक एखादा पदार्थ खायचा म्हणजे त्यासोबत सर्व्ह केले जाणारे इतर पदार्थ ही हवेच. जसे की, पुरणपोळी - कटाची आमटी, मोदक - तूप, बिर्याणी - रायतं, मिसळ - पाव, पिझ्झा - चीज. काही खास डिशेश या त्यासोबत तोंडी लावायला असलेल्या पदार्थांसोबत खाल्ल्या की अधिक टेस्टी लागतात. असे असले तरीही आजकाल कॉम्बिनेशन पदार्थांचा अनोखा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अफलातून कॉम्बिनेशन्स असलेले पदार्थ सर्व्ह करणारे हॉटेल्स, कॅफे, फूड स्टॉल सध्या ठिकठिकाणी दिसत आहेत. सध्या इंस्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात मिसळ आणि पिझ्झाचे कॉम्बिनेशन असलेला मिसळ पिझ्झा सर्व्ह केला जात आहे. मिसळ - पिझ्झा हा नवीन पदार्थ नेमका काय आहे, तो कसा बनवला जातो ते पाहूयात(Pune's 'Misal Pizza' is the New Bizarre Combo Giving Trust Issues to Foodies).
मिसळ पिझ्झा नक्की बनवतात तरी कसा ?
that_food_freak या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मिसळ पिझ्झा असं वेगळं कॉम्बिनेशन असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये मिसळ पिझ्झा नेमका कसा बनवला जातो याची रेसिपी शेअर केली आहे, त्याचबरोबर मिसळ पिझ्झा बनवला देखील आहे.
कोकणात करतात तशी अस्सल पारंपरिक कुळथाची पिठी करा, पावसाळ्यात जेवणाचा बेत जमेल झक्कास !
फ्रिजमध्ये ठेवलं तरी आल्याला बुरशी लागते ? २ सोप्या ट्रिक्स, आलं टिकेल वर्षभर...
मिसळ पिझ्झा बनवण्यासाठी सर्वातआधी एक पिझ्झा बेस घेऊन त्यावर भरपूर मेयॉनीज लावून घेतले आहे. त्यानंतर त्यावर फरसाण पसरवून घातले आहे. सगळ्यात शेवटी या बेसवर भरपूर चीज, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, उकडवून घेतलेले मूग घालून हा पिझ्झा बेक होण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवला. एवढंच नव्हे तर हा मिसळ पिझ्झा खाताना त्याला अस्सल झणझणीत मिसळचा टच येण्यासाठी म्हणून तो तर्री सोबत सर्व्ह केला जातो. असे हे भन्नाट कॉम्बिनेशन असलेला मिसळ पिझ्झा आपण एकदा तरी टेस्ट करून पाहायला हवा अशी इच्छा नक्कीच होते.
काही नेटकऱ्यांनी हा कॉम्बिनेशन असलेला पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याउलट काहींनी हा कोणता नवीन पदार्थ म्हणून नाक मुरडत नापसंती दर्शवली आहे.