अभिनेत्री, मॉडेल यांचा बांधा नेहमी सडपातळच असावा.. या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे नेहमी का पाहिलं जातं... सौंदर्य क्षेत्रात काम करण्याचे काही मापदंड नक्कीच आहेत, पण म्हणून सत्य परिस्थिती जाणून न घेता जाड होण्याबाबत एखाद्याला एवढं ट्रोल केलं जाणं हे खरोखरंच अतिशय खेदजनक आहे.. मिस युनिव्हर्सहरनाज संधू (Harnaaz Sandhu suffering from Celiac disease) सध्या याच परिस्थितीतून जात आहे... तिचे वजन हल्ली चांगलेच वाढले असून याच कारणामुळे ती सोशल मिडियावर जबरदस्त ट्रोल होत आहे.
मध्यंतरी एका फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हरनाजही सहभागी झाली होती. या शोमध्ये हरनाझने चांगलंच वेटगेन (weight gain by Harnaaz Sandhu) केल्याचं दिसून आलं. काही वर्षांपुर्वी शिडशिडीत, एकदम स्लिमट्रिम दिसणारी हरनाझ नेमकी हीच का.. असं वाटण्याएवढा फरक तिच्यामध्ये दिसत आहे.. आणि हेच तिच्या ट्रोल होण्याचं कारण आहे.. पण ती जाड झाली आहे, यासाठी तिचं आजारपण कारणीभूत आहे.. तिला Celiac हा आजार झाला असून यामुळेच तिचं वजन झपाट्याने वाढत आहे... तिला जन्मापासूनच हा आजार असल्याचं तिनं सांगितलं.
सिलिएक (Celiac) आजार म्हणजे काय
- हा असा एक आजार आहे ज्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या प्रोटीन्सची आणि ग्लुटेनची ॲलर्जी असते. पचन संस्थेशी संबंधित असणाऱ्या या आजाराला ग्लुटेन सेन्सिटिव्ह एन्ट्रोपॅथी असंही म्हटलं जातं.
- असा आजार असणाऱ्या व्यक्ती गहू, बार्ली किंवा जव यांच्यापासून तयार केलेले पदार्थ पचवू शकत नाहीत.
- वरील धान्याचे पदार्थ खाल्ल्यास सिलिएक आजार असणाऱ्या व्यक्तींच्या आतड्याच्या आतील भागावर परिणाम होतो. परिणामी अन्नाचे पचन योग्य पद्धतीने न झाल्याने या व्यक्ती एकतर बारीक असतात किंवा जाड होतात.
- फक्त एवढेच नाही तर हाडांची ठिसूळता, प्रजनन संस्थेचे विकार, दातांचे दुखणे, स्नायुंमध्ये वेदना, पोटदुखी अशा अनेक आजारांनी ते रूग्ण त्रस्त असतात.
- हा आजार अनुवंशिक असून त्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त आहे.
सिलिएक (Celiac) आजाराची लक्षणं कोणती
- वारंवार पोट फुगणे
- काहीही कारण नसताना वजन झपाट्याने कमी होणे किंवा खूप वाढणे
- खाण्यापिण्यात थोडा जरी बदल झाला तरी पोट बिघडणे
- थकवा आणि अशक्तपणा येणे