तब्बल २१ वर्षानंतर भारताला 'मिस युनिव्हर्स' चा किताब मिळवून देणारी भारताची हरनाज संधू कौर ही सगळ्यांच्या लक्षात आहे. हरनाज संधू भारताची ७० वी 'मिस युनिव्हर्स' ठरली. हरनाजनं अंतिम फेरीत पराग्वेच्या नादिया फरेरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या ललेला मसवाने या दोघींना मागे टाकत विजय मिळवला होता. इस्रायलच्या इलियटमध्ये आयोजित या स्पर्धेत मेक्सिकोची माजी 'मिस युनिव्हर्स' अँड्रिया मेजा हिने हरनाज संधूला 'मिस यूनिव्हर्स'चं मुकुट देऊन गौरवलं होत.
१५ जानेवारी २०२३ रोजी 'मिस युनिव्हर्स २०२२' या स्पर्धेची अंतिम फेरी होती. या स्पर्धेत अमेरिकेची आर बॉनी ग्रेबीएल हिने मिस यूनिव्हर्सचा किताब पटकावला. याप्रसंगी विजेती 'मिस युनिव्हर्सला भारताच्या पूर्व 'मिस युनिव्हर्स हरनाज संधूने मुकुट घालून तिचा गौरव केला. या प्रसंगी तब्बल एका वर्षानंतर हरनाज संधू परत प्रकाश झोतात आली. जशी ती मिस युनिव्हर्सच्या मंचावर अवतरली तसे तेव्हा तिला पाहून सगळेच चकित झाले. तिला पाहून चकित होण्याचं कारण होत तीच वाढत वजन. याप्रसंगी हरनाजला पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. तिच्या वाढत्या वजनावरून तिला नाव ठेवण्यात आली तसेच वेगवेगळ्या टिकात्मक कमेंट्स करून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते(Miss Universe 2021 Winner Harnaaz Kaur Sandhu Weight Gain Trolled For Obesity).
काय आहे तिच्या वाढत्या वजनाचे कारण... आपल्या वाढत्या वजनाचे स्पष्टीकरण देताना हरनाजने सांगितले की ती 'सिलिएक' नामक आजाराने ग्रस्त आहे. या आजारामध्ये व्यक्तीचे वजन झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते. या आजारामध्ये आपले शरीर ग्लूटेनयुक्त पदार्थांना पचवू शकत नाही, त्यामुळे आपल्या आतड्यांना नुकसान पोहोचते. म्हणून 'सिलिएक' आजाराने ग्रस्त व्यक्तीला ग्लूटेन युक्त पदार्थ जसे की गव्हाचे पीठ आणि इतर काही गोष्टी खाण्यावर मनाई असते. या आजारावर मात करण्यासाठी ती तिचे डाएट अत्यंत काटेकोरपणे पाळते. तसेच रोजच्या खाण्यातील काही पदार्थ तिच्यासाठी वर्ज्य आहेत, ते न खाण्याकडे तिचे लक्ष असते.
आपल्या वाढत्या वजनावर हरनाज काय म्हणते... आपल्या वाढत्या वजनावर नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर हरनाज सांगते, 'मिस युनिव्हर्सचा' किताब जिंकल्यानंतर पुढील पूर्ण एक महिना मी आरामच केला होता. या दरम्यान मी काहीच वर्कआऊट केले नव्हते. मी फक्त माझ्या परिवार आणि मित्र - मैत्रिणींसोबत खायचे - प्यायचे आणि एन्जॉय करायचे. "माझ्या वाढत्या वजनावरून जेव्हा मला लोक ट्रोल करायचे किंवा टोमणे मारायचे तेव्हा मला खूप वाईट वाटून फारच दुःख व्हायचे".
तिने परत जोरदार व्यायामाला सुरुवात केली आहे...
आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीतून थोडासा वेळ काढून योगा व व्यायाम आणि मेडिटेशन करण्याचे तिने ठरवले आहे. हरनाज संधूने नुकताच तिच्या इंस्टाग्राम पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. अध्यात्म, योग आणि आयुर्वेद यांच्यामार्फत आपले शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी मिस युनिव्हर्स हरनाज तीर्थनगरी गंगा नदीच्या किनारी पोहोचली आहे. हरनाज संधू हिने नुकतीच ऋषिकेशला भेट दिली आहे. गंगा नदीच्या किनारी बसून मेडिटेशन करण्याचा आनंद तिने घेतला आहे. मिस युनिव्हर्स हरनाज तपोवनातील एका आरोग्यधाममध्ये, शारीरिक आणि मानसिक संतुलन राखून प्रसन्न व स्वस्थ कसे राहायचे याचे धडे गिरवत आहे.