Join us  

मिस युनिव्हर्स हरनाझ म्हणते, मला स्ट्रगलिंग तरुणाला डेट करायला आव़डेल, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 6:25 PM

मिस युनिव्हर्स स्पर्धेत हरनाझच्या उत्तरांनी जिंकली उपस्थितांची मने...

ठळक मुद्देम्हणून हरनाझला आवडेल स्ट्रगलिंग तरुणाला डेट करायला... परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना दिली एकाहून एक चपखल उत्तरे

२१ वर्षाच्या हरनाझ संधूने नुकताच मिस युनिव्हर्स २०२१ हा किताब पटकावला आहे. भारताला तब्बल २१ वर्षांनंतर हा किताब मिळाल्यानंतर तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या स्पर्धेच्या मुलाखतीत हरनाझला बरेच प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिने अतिशय नेमकेपणाने दिल्यामुळे या किताबावर अखेर तिची मोहोर उमटली. तुला कोणाशी डेट करायला आवडेल, श्रीमंत व्यक्ती की स्ट्रगलिंग तरुण? यावर हरनाझने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. "श्रीमंत व्यक्तीपेक्षा स्ट्रगल करणाऱ्या तरुणाला डेट कऱणे मी जास्त पसंत करेन" असे ती म्हणाली. याचं कारण काय असं विचारल्यावर हरनाझ म्हणाली, "मी स्वत: बराच संघर्ष केला आहे आणि भविष्यातही करणार आहे. संघर्ष केला तरच आपण एकमेकांची किंमत करु शकतो" असे मला वाटते असे उत्तर देत हरनाझने परीक्षकांची मन जिंकली. 

(Image : Google)

रोजच्या लाईफमध्ये असणाऱ्या ताणाशी कसं डील करायचं याबाबत तरुणींना काय सांगशील असं विचारल्यावर हरनाझने त्यावर अतिशय नेमके उत्तर दिले होते. “ आजच्या काळात ज्या तरुणांना प्रेशरचा सामना करावा लागतो त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवावा. आपण युनिक आहोत आणि हिच बाब तुम्हाला सुंदर बनवते हे कायम लक्षात ठेवा. स्वत:ची इतरांशी तुलना करणे बंद करा आणि जगात जे काही होत आहे त्या महत्त्वाच्या गोष्टींवर बोला असा सल्लाही हरनाझने दिला होता. तुम्हीच तुमच्या जीवनाचे लीडर असल्याने तुम्हीच स्वत:चा आवाज आहात हे लक्षात घ्या. मी स्वत:वर विश्वास ठेवते, त्यामुळेच आज मी इथे आहे. 

(Image : Google)

अनेकांना हवामानबदल हा फसवा आहे असे वाटते, त्यांना तुम्ही याबाबत कसे पटवून द्याल? असाही प्रश्न तिला विचारण्यात आला होता, त्यावर निसर्ग अनेक अडचणींचा सामना करत आहे आणि त्याला आपले वागणे जबाबदार आहे. आता कमी बोलून जास्त कृती करायची वेळ आली आहे. कारण आपली प्रत्येक कृती एकतर निसर्गाचे रक्षण करेल नाहीतर त्याचा नाश करेल. पश्चाताप आणि दुरुस्ती करण्यापेक्षा प्रतिबंध आणि संरक्षण करणे केव्हाही चांगले असेच मी याबाबतीत तुम्हाला सांगेन असे हरनाझ म्हणाली. इस्रायलमध्ये एका रिसॉर्टमध्ये झालेल्या Miss universe 2021 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेक्सिकोची अँड्रिया मेझा हिने हरनाझच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सच्या मुकुट घातला. ती २०२० ची मिस युनिव्हर्स विजेती होती. मूळ चंदीगडची असलेल्या २१ वर्षीय हरनाझ नृत्य, पोहणे आणि घोडेस्वारी यामध्येही तरबेज आहे. याआधीही तिला अनेक पुरस्कार मिळाले होते.      

टॅग्स :सोशल व्हायरलहरनाज संधूमिस युनिव्हर्स