Lokmat Sakhi >Social Viral > पुरुषांना तरी मनातलं बोलण्याचं, रडण्याचं स्वातंत्र्य कुठं आहे?- मिथिला पालकर सांगते अवतभवतीच्या पुरुषांची घुसमट

पुरुषांना तरी मनातलं बोलण्याचं, रडण्याचं स्वातंत्र्य कुठं आहे?- मिथिला पालकर सांगते अवतभवतीच्या पुरुषांची घुसमट

Mithila Palkar Explains About The Male Attitude And Their Freedom: मिथिला पालकर सांगते पुरुषांसाठीही समाजाने घातलेल्या चौकटींविषयी, आणि त्यातून हरवलेल्या संवादाविषयीही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 02:38 PM2024-01-12T14:38:51+5:302024-01-12T14:39:40+5:30

Mithila Palkar Explains About The Male Attitude And Their Freedom: मिथिला पालकर सांगते पुरुषांसाठीही समाजाने घातलेल्या चौकटींविषयी, आणि त्यातून हरवलेल्या संवादाविषयीही..

Mithila Palkar explains about the male attitude and the emotions of men | पुरुषांना तरी मनातलं बोलण्याचं, रडण्याचं स्वातंत्र्य कुठं आहे?- मिथिला पालकर सांगते अवतभवतीच्या पुरुषांची घुसमट

पुरुषांना तरी मनातलं बोलण्याचं, रडण्याचं स्वातंत्र्य कुठं आहे?- मिथिला पालकर सांगते अवतभवतीच्या पुरुषांची घुसमट

Highlightsती पुरुषांना सांगतेय की पुरुषांनो कधी तरी स्वत:च्या मनातली असुरक्षितता, भीती, हळवेपणा दाखवून तुमच्या भावभावनांना मोकळी वाट करून दिली, तर तुमचं पुरुषत्त्व कमी होणार नाही.

आपल्याकडे मुलींना नेहमीच एका चौकटीत वाढवलं जातं. त्या चौकटीच्या बाहेर सहसा त्यांना जाऊ दिलं जात नाही. त्यांनी राहायचं कसं, कपडे कोणते घालायचं, हसायचं कसं, काय खेळायचं, शिक्षण कुठे आणि कसं घ्यायचं असे सगळेच नियम त्या चौकटीत घातलेले असतात. मुलींना एकीकडे ही सगळी बंधनं असताना मुलांना मात्र मुक्त सोडलेलं असतं, असं आपल्याला वाटतं. पण खरंच तसं असतं का? मुलींची जडणघडण चाकोरीबद्ध होत असते आणि मुलांची मात्र स्वैरपणे होते, त्यांच्यावर कोणतीच बंधनं नसतात असं आपल्याला जे वाटतं, ते खरंच तसं असतं का? मिथिला पालकरच्या भाषेत सांगायचं तर याचं उत्तर 'नाही' असंच आहे. मुलांवर पण अनेक नियम लादलेले असतात, त्यविषयीच बघा काय सांगतेय मिथिला पालकर..(Mithila Palkar explains about the male attitude and their emotional control)

 

मिथिला पालकरच्या एका मुलाखतीलचा छोटासा भाग hauterrfly and thestorytellerindia या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मिथिला पुरुषांना वाटणारी असुरक्षितता, त्यांच्यातल्या भावभावनांचा कल्लोळ आणि फक्त पुरुष आहोत, म्हणून त्या भावनांना त्यांनी घातलेला बांध, याविषयी मुक्तपणे बोलली आहे.

फक्त १ मिनिटात घरच्याघरी तयार करा सॅफ्राॅन नाईट क्रिम, डार्क स्पॉट्स- पिंपल्स येणार नाहीत

ती सांगतेय की मुलांसाठी आपल्याकडे काही नियम असतात. जसे की तू मुलगा आहेस, म्हणून तू रडू शकत नाहीस.. तू खूप हळवं होऊन चालत नाही. तुला तुझ्या भाव- भावना न दाखवता नेहमी विशिष्ट पद्धतीने राहिलं- वागलं पाहिजे. हेच जे लहानपणापासून वारंवार मुलांच्या मनावर, डोक्यात ठासवलं जातं, त्यामुळे मग पुरुष त्यांच्या भावना मुक्तपणे मोकळ्या करू शकत नाहीत. व्यक्त होऊ शकत नाहीत.

 

म्हणूनच ती पुरुषांना सांगतेय की पुरुषांनो कधी तरी स्वत:च्या मनातली असुरक्षितता, भीती, हळवेपणा दाखवून तुमच्या भावभावनांना मोकळी वाट करून दिली, तर तुमचं पुरुषत्त्व कमी होणार नाही.

केस धुतले की बाथरुममध्ये खूप केस गळून पडलेले दिसतात? ५ टिप्स- केस गळणार नाहीत

जेव्हा पुरुष स्वत:ला असं कायम बांधून ठेवणं थांबवतील, तेव्हाच तर स्त्रिया त्यांना समजून त्यांना सांभाळून घेऊ शकतील... 

 

Web Title: Mithila Palkar explains about the male attitude and the emotions of men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.