स्वयंपाक करायचा म्हटलं की, बेसिंग मधल्या भांड्यांच्या ढीग पाहून आपल्या जीववर येते. भांडी घासून घासून आपल्याला नाकी नऊ येतात. (how to clean utensils)सध्या बाजारात देखील विविध प्रकारची भांडी पाहायला मिळतात. अनेकदा जेवण बनवताना भांडी जळतात, करपतात किंवा अधिक चिकट होतात. तेलाचे- तूपाचे डाग सहज काही निघत नाही. (how to clean stainless steel utensils)
भांडी घासण्यासाठी साबण आणि स्क्रबरचा वापर करुन देखील तव्या किंवा कढईचा काळपटपणा काही जात नाही.(how to clean aluminum utensils) अनेकदा भांडी घासताना घरातील डिश वॉश आणि साबणाची देखील मदत होत नाही. परंतु, आम्ही एक सोपी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने भांडी चकाचक आणि स्वच्छ निघतील. (Bhande kashe ghasave)
ना तामझाम ना जेवणावळी, तरुण जोडपी म्हणतात आम्ही ‘मायक्रो वेडिंग’ करणार, लग्नाचा नवा ट्रेंड
भांडी घासण्यासाठी याआधी आपण अनेक ट्रिक वापरुन पाहिल्या. बेकिंग सोडा, मीठ, व्हिनेगर यांने भांडी स्वच्छ होतात हे देखील तितकच खरं आहे. परंतु, यामध्ये अनेकदा भांड्यांवरचे कोटिंग निघण्यास मदत होते. किंवा हात देखील आपले खराब होतात. बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वास आपल्या नाकात गेला तर आपल्याला नकोसे होते. पूर्वीच्या काळी चुल मांडली जायची. तांब्या-पितळेची भांडी घासताना अनेकदा माती किंवा राखेचा वापर केला जायचा. परंतु, हल्ली या गोष्टी आपल्याला सहज पाहायला आणि करायला मिळत नाही. जर आपल्याकडे देखील, तांब्या-पितळेची भांडी असतील तर आपण राखेने किंवा कोळशाने घासू शकतो.
बाजारात मिळणारा डिशवॉशने भांडी कितीही घासली तरी तेलाचे किंवा काळे डाग सहसा निघण्यास मदत होत नाही. भांड्यावर जमलेला तेलाचा थर, काळापट डाग काढण्यासाठी आपण ही सोपी ट्रिक वापरु शकतो. हा पावडर आपण तयार देखील करुन ठेवू शकतो. ज्यामुळे आपला वेळ देखील सहज वाचेल.
भांडी घासण्यासाठी सोपी ट्रिक
चुलीमधला कोळसा थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यात बारीक करा. त्यानंतर एका ताटात कोळशाचा पावडर घेऊन त्यावर लिंबू पिळून घ्या. त्यात डिश वॉश लिक्विड टाका. चांगले मिक्स करुन घ्या. स्टिल किंवा ॲल्युमिनिअमच्या भांड्यावर हे मिश्रण लावून स्क्रबरने चांगले घासून घ्या. पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे भांड्यांवरील काळपट्ट, तेलाचे जमा झालेले थर निघण्यास मदत होईल.