Join us  

पेपरचाच फ्रॉक आणि पेपरचाच लेहेंगा!! उर्फी जावेद म्हणे, पेपर क्वीन.. पहा कागदी कमाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 4:45 PM

Photos of Paper Queen: उर्फी जावेद (Urfi Jawed) आधीच तिच्या अतरंगी कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे.. आत त्यात तिने आणखी एकीच्या अतरंगी कपड्यांचे फोटो शेअर केले आहेत. 

ठळक मुद्देउर्फीला तिची ड्रेसिंग स्टाईल आवडली त्यामुळे तिने या पेपर क्वीनचे काही फोटो इन्स्टा स्टोरी म्हणून शेअर केले होते.

मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Jawed) हिच्या कपड्यांची नेहमीच चर्चा असते. त्यासाठी कारणही तसेच असते. एकतर ती नेहमीच खूपच जास्त बोल्ड (bold look of Urfi Jawed) कपडे घालते आणि दुसरं म्हणजे तिचे असेच बोल्ड लूकमधले फोटो सोशल मिडियावर शेअर करून ती त्या कपड्यांचं नेहमीच समर्थन करत असते. त्यामुळे तिच्या कपड्यांसोबतच तिचे बिंधास्त बोलणेही नेटीझन्सच्या कायमच लक्षात राहते. आता उर्फीने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून शेअर केले आहेत. यामध्ये जी मुलगी आहे तिला ती पेपर क्वीन (Photos of Paper Queen) असं म्हणते आहे.

 

उर्फीने ज्या मुलीची स्टोरी शेअर केली आहे तिचं नाव अपेक्षा राय असं आहे. ती व्यवसायाने फॅशन डिझायनर असून स्वत:ला तिने पेपर क्वीन असे नाव दिले आहे.

१३ वर्षांची फौजिया झाली खांडवातल्या मुकबधिर लोकांचा आधार.. लहानग्या पोरीची कमाल

तिने शेअर केलेले ड्रेसचे काही फोटो खरोखरंच खूप वेगळे आहेत. चक्क वर्तमान पत्रांचे  कागद वापरून तिने ड्रेस शिवले आहेत. वर्तमान पत्राच्या कपड्याचा लेहेंगा, लाँग फ्रॉक, ओढणी असे अनेक छान छान ड्रेस तिने  शिवले आहेत. याशिवाय ती ते ड्रेस खूप छान पद्धतीने कॅरी करते आहे. उर्फीला तिची ड्रेसिंग स्टाईल आवडली त्यामुळे तिने या पेपर क्वीनचे काही फोटो इन्स्टा स्टोरी म्हणून शेअर केले होते.

 

शॉर्ट टॉप आणि पटियालाया पेपर क्वीनने जे काही पेपर ड्रेसचे फोटो शेअर केले आहेत, त्यात एक ड्रेस शॉर्ट टॉप आणि पटियाला असाही आहे.

एकदम बोअर झालंय लाइफ? नात्यातला रोमांसच संपला? अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय, छान सोपा उपाय

शॉर्ट टॉप आणि पटियाला या दोघांनाही अतिशय छान पद्धतीने चुन्या घातल्या आहेत. पेपरचे असूनही हे ड्रेस एवढे टिकाऊ कसे, असा प्रश्न पडतो. या ड्रेसवर तिने प्लास्टिकचे पातळ आवरण टाकले असावे, असेही काही नेटिझन्सला वाटते.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्राम