Join us

Urmila Matondkar : 'तुझ्या येण्याने आमचं आयुष्य ...' उर्मिला मातोंडकरच्या पतीची 'ती' पोस्ट व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 16:20 IST

Urmila Matondkar : ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी उर्मिला आणि तिच्या पतीला शुभेच्छा द्यायला सुरूवात केली.

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी राजकीय वक्तव्यांमुळे तर कधी सुंदर पोस्टमुळे ती सतत चर्चेचा विषय ठरते. उर्मिलानं काश्मिरी व्यापीरी आणि मॉडेल मोहसिन अख्तरबरोबर वयाच्या ४२ व्या वर्षी लग्नगाठ बांधली.  आता उर्मिलाच्या पतीनं एका वर्षाच्या मुलीसोबत आपला फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर या दोघांनी मुलगी दत्तक घेतल्याच्या चर्चांना उधाण आलंय. (Mohseen akhtar husband of urmila matondkar attract netizens through his post)

उर्मिलाचा पती मोहसिननं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर आहे. लिटील प्रिन्सेस, तुझ्या येण्याने आमचं आयुष्य उजळून निघालंय असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.  तुझा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करताना आनंद वाटतो आणि एका वर्षात तू आमच्या आयुष्यात आनंद निर्माण केला आहेस. हॅप्पी बर्थडे आयरा.''

 ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी उर्मिला आणि तिच्या पतीला शुभेच्छा द्यायला सुरूवात केली. याविषयी  खरं जाणून घेण्यासाठी उर्मिलाला आणि तिच्या पतीला माध्यमांनी संपर्क केला. त्यानंतर समोर आलं की, या दोघांनी ती आपली पुतणी असल्याचं स्पष्ट केलं आहे.  याआधी सगळ्यांना ती या दोघांची मुलगी असल्याचं वाटत होतं.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरसोशल व्हायरल