Lokmat Sakhi >Social Viral > Mosquito Repellent Plants : रात्री डास खूप चावतात? पावसाळ्याच्या सुरूवातीला ५ झाडं लावा; डास कायमचे राहतील लांब 

Mosquito Repellent Plants : रात्री डास खूप चावतात? पावसाळ्याच्या सुरूवातीला ५ झाडं लावा; डास कायमचे राहतील लांब 

Mosquito Repellent Plants : झेंडूची वनस्पती देखील डासांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. माणसांना झेंडूचा सुगंध जितका आवडतो तितकाच डासांनाही आवडतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 03:51 PM2022-05-22T15:51:02+5:302022-05-22T16:08:24+5:30

Mosquito Repellent Plants : झेंडूची वनस्पती देखील डासांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. माणसांना झेंडूचा सुगंध जितका आवडतो तितकाच डासांनाही आवडतो.

Mosquito Repellent Plants : Mosquitoes prevention tips grow these plants at home to get rid of mosquitoes | Mosquito Repellent Plants : रात्री डास खूप चावतात? पावसाळ्याच्या सुरूवातीला ५ झाडं लावा; डास कायमचे राहतील लांब 

Mosquito Repellent Plants : रात्री डास खूप चावतात? पावसाळ्याच्या सुरूवातीला ५ झाडं लावा; डास कायमचे राहतील लांब 

पावसाळ्यात डासांची संख्या झपाट्याने वाढतेय. अनेक ठिकाणी पाणी साचणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्याच्या चाव्याद्वारे  स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू सारखे आजार पसरतात जे जीवघेणे असतात. अशा स्थितीत डासांपासून दूर राहण्यासाठी क्रीम्स, स्प्रे, मॅट अशा अनेक प्रकारचे उपाय केले जातात. (Mosquito Repellent Plants) पण याशिवाय काही घरगुती उपाय आहेत.

ज्यांच्या मदतीने तुम्ही डासांपासून मुक्ती मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही कमी खर्चात डासांपासून सुटका मिळवू शकता. (Grow these plants at home to get rid of mosquitoes)

घराच्या आजूबाजूला पाणी आणि घाण साचल्यास डास जास्त येतात. पण काही झाडे अशी आहेत जी अंगणात किंवा बाल्कनीत ठेवल्याने डासांना घरापासून दूर ठेवतात. ही झाडे लावण्याचे दोन फायदे आहेत, एक तर डासांपासून दूर राहतील आणि दुसरे म्हणजे तुमचे घरही सुंदर दिसेल.

1) कडुलिंब

डास, माश्या आणि इतर प्रकारचे कीटक दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाची लागवड करणे खूप फायदेशीर आहे. तुमच्या घरात जर बाग असेल तर तिथे कडुलिंबाचे झाड लावा. ज्यामुळे डास अजिबात फिरकणार नाहीत.

2) तुळस

ही अशी वनस्पती आहे जी तुम्हाला प्रत्येक घरात आढळेल. धार्मिक महत्त्व असण्यासोबतच ती वातावरण शुद्ध करते. तुळशीची वनस्पती देखील डासांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. घराबाहेर, दाराजवळ किंवा खिडकजवळ तुळस लावल्यानं डासांपासून लांब राहता येतं. 

3) झेंडू

झेंडूची वनस्पती देखील डासांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. माणसांना झेंडूचा सुगंध जितका आवडतो तितकाच डासांनाही आवडतो. डासांना फुलांचा तीव्र वास आवडत नाही, म्हणून तुम्ही ते बागेत किंवा घराबाहेर कुंडीत लावू शकता.

4) लेव्हेंडर

लॅव्हेंडर फ्लॉवर देखील डासांना दूर ठेवण्यास मदत करते. त्याचा गोड वास खूप छान असतो. हे रोप तुम्ही भांड्यातही लावू शकता.

Web Title: Mosquito Repellent Plants : Mosquitoes prevention tips grow these plants at home to get rid of mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.