आपल्या मुलाने शिकून खूप मोठं व्हावं, असं प्रत्येक आई - वडिलांचं स्वप्न असतं. त्याला प्रत्येक विषयात चांगले गुण मिळावे, यासाठी पालक त्याच्या पुढे - मागे सतत अभ्यास कर म्हणून तगादा लावतात. पण जर मुलाला कमी गुण मिळाले, तर पाल्याला पालकांच्या रागाला सामोरं जावं लागतं. कमी गुण मिळाल्यावर टीचर पेपरवर पॅरेंट्सची साइन आणायला सांगतात. त्यावेळी पालकांना आपण पेपरमध्ये काय दिवे लावले आहेत, हे दिसून यायचं.
अशा वेळी पालकांकडून ओरडा आणि फटके मिळतात ते वेगळंच. मात्र, सोशल मिडीयावर अशा एका पेपरची चर्चा होत आहे, ज्यात एका मुलीला गणितात शून्य गुण मिळाले असून, तिच्या आईने फटकारण्याऐवजी अनोख्या पद्धतीने मोटीवेट केलं आहे(Mother Encourages Her Daughter After She Scores Low in Her Test Results, Heartwarming Pics Win Internet).
..आली शाळेची आठवण
found my grade 6 math notebook and love how precious mother was signing every bad test with an encouraging note for me! pic.twitter.com/AEJc3tUQon
— zainab (Taylor’s version) (@zaibannn) August 25, 2023
सोशल मिडीयावरील एक पोस्ट सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये एका मुलीने इयत्ता सहावीमधील गणित या पेपरचा फोटो शेअर केला आहे. या व्हायरल फोटोमध्ये त्या मुलीला गणिताच्या पेपरमध्ये १५ पैकी ० गुण मिळाले आहेत. तिच्या आईने त्या पेपरवर स्वाक्षरी तर केली आहेच, यासह काही प्रोत्साहनपर शब्द देखील लिहिले आहेत.
फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मुलीने लिहिले की, 'इयत्ता सहावीमधील गणिताची जुनी वही सापडली. त्यावेळी मला गणितात कमी गुण मिळाले होते. तरीही साईन करून माझ्या आईने, सकारात्मक संदेश लिहिला होता.' त्या पेपरवर साईन करत तिच्या आईने लिहिले की, 'असा निकाल आणायला देखील खूप धाडस लागतं.'
फोडण्यांच्या तेलानं-धुरानं किचनच्या खिडक्या चिकट-मेणचट झाल्या? ४ भन्नाट टिप्स- खिडक्या चमकतील चटकन
तिने तिच्या पुढील ट्वीटमध्ये म्हटलं की, 'त्यानंतर मी गणित या विषयामध्ये खूप मेहनत घेतली, व चांगले गुण मिळवले. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला प्रत्येक परिस्थितीत समजून घेता, तेव्हा त्यामधून सकारात्मकच निकाल मिळतो.'
कपड्यावर तेल सांडले? कपडे न धुता १५ मिनिटांत तेलकट डाग काढण्याची सोपी युक्ती
सोशल मिडीयावर पसंती
सोशल मिडीयावर सध्या ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टला ७६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच यूजर्स कमेंट करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावर एकाने लिहिले की, 'ओरडा बसू नये म्हणून आम्ही स्वतः आईची खोटी साईन करायचो.' तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, 'म्हणूनच आई ही सर्वोत्तम मार्गदर्शक, शिक्षक, मित्र आणि फिलॉस्फर आहे' ही व्हायरल पोस्ट पाहून तुमच्या मनात काय येतंय हे नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा.