Lokmat Sakhi >Social Viral > मुलीच्या नाकात अडकलेला मनुका दिसला नाही म्हणून आईने डॉक्टरांना फटकारलं.... बघा व्हायरल स्टोरी

मुलीच्या नाकात अडकलेला मनुका दिसला नाही म्हणून आईने डॉक्टरांना फटकारलं.... बघा व्हायरल स्टोरी

स्कॉटलंडमधल्या एका आईने डॉक्टरांना चांगलंच फटकारून काढलं.. बघा नेमकं काय झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2024 06:33 PM2024-06-03T18:33:29+5:302024-06-03T18:34:25+5:30

स्कॉटलंडमधल्या एका आईने डॉक्टरांना चांगलंच फटकारून काढलं.. बघा नेमकं काय झालं

Mother in scotland slams doctors for failing to notice raisin stuck in her sick toddler’s nose for 3 months | मुलीच्या नाकात अडकलेला मनुका दिसला नाही म्हणून आईने डॉक्टरांना फटकारलं.... बघा व्हायरल स्टोरी

मुलीच्या नाकात अडकलेला मनुका दिसला नाही म्हणून आईने डॉक्टरांना फटकारलं.... बघा व्हायरल स्टोरी

Highlightsजी गोष्ट दुसऱ्या डॉक्टरला १० मिनिटांत समजली ती आधीच्या डॉक्टरांनी ३ महिने कशी काय समजली नाही म्हणून क्रिस्टीने त्या आधीच्या डॉक्टरांना चांगलंच फैलावर घेतलं

लहान मुलं कधी काय करतील काही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अतिशय बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. आपल्याकडे लहान मुलांनी कानात किंवा नाकात एखादी लहानशी वस्तू घातल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. तसंच एकदा स्कॉटलंडमधील ३- ४ वर्षांच्या मुलीने फेब्रुवारी महिन्यात केलं. तिने तिच्या नाकात चक्क मनुका टाकला. तेव्हा तिच्या आईचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे जेव्हा मुलीला त्रास व्हायला लागला तेव्हा तिला तो त्रास कशाने होत आहे हे काही लक्षात आलं नाही आणि मुलीलाही आईला ते सांगता आलं नाही. पेटन हेंडले असं त्या मुलीचं नाव.

 

पेटनचा त्रास असह्य होऊ लागल्यावर आईने म्हणजेच क्रिस्टीने तिला जेव्हा डॉक्टरांकडे नेलं तेव्हा त्यांना असं वाटलं की तो त्रास घशातल्या किंवा नाकातल्या इन्फेक्शनमुळे होतो आहे.

बीपी- शुगरचा त्रास असेल तर सगळ्यात आधी 'हा' पांढरा पदार्थ बंद करा- मिठापेक्षाही आहे वाईट

त्यामुळे ते कमी करण्यासाठी त्यांनी काही औषधी दिली आणि नाकात, घशात टाकायला काही स्प्रे दिले. पण तो त्रास कमी झाला नाही. उलट सर्दी झाल्याप्रमाणे तिचं नाक बंद झालं. हे पाहून तिच्या पालकांनी पुन्हा तिला डॉक्टरांकडे नेलं आणि त्यात काही अडकलंय का हे पाहावं म्हणून सुचवलं. पण डॉक्टरांनी ते ऐकलं नाही. 

 

हळूहळू पेटनचा त्रास खूपच वाढत गेला. तिला थंडी- ताप येऊ लागला. त्यामुळे मग चिंतीत झालेल्या पालकांनी तिला Glasgow Children's Hospital येथे मे महिन्यात नेले.

साखर खाणं एकदम बंद करणंही ठरू शकतं त्रासदायक, तब्येतीवर होऊ शकतात ६ परिणाम

तिथल्या डॉक्टरांनी पेटनचा चेहरा वर करून तिच्या नाकात तपासलं आणि अवघ्या १० मिनिटांत तिला काय झालं आहे, याचं निदान करून तिच्या नाकातून मनुका बाहेर काढला. तब्बल ३ महिन्यांपासून मनुका तिच्या नाकात होता. त्यामुळे त्याच्या आजुबाजुला सर्व फंगस वाढत चाललं होतं. त्यामुळे हळूुहळू पेटनची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन ती दिवसेंदिवस खराब होत चालली होती. जी गोष्ट दुसऱ्या डॉक्टरला १० मिनिटांत समजली ती आधीच्या डॉक्टरांनी ३ महिने कशी काय समजली नाही म्हणून क्रिस्टीने त्या आधीच्या डॉक्टरांना चांगलंच फैलावर घेतलं. 

 

Web Title: Mother in scotland slams doctors for failing to notice raisin stuck in her sick toddler’s nose for 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.