दक्षिण फ्लोरिडामधील एक बेपत्ता झालेला चिमुरडा त्याच्या आईला सुखरूप सापडला आहे. कॅनडामध्ये सुरक्षितपणे सापडल्यानंतर तो सध्या त्याच्या आईसह राहत आहे. पोलिसांनी सांगितले की, 6 वर्षीय जोजो मोरालेसचे वडील जॉर्ज मोरालेस आणि आजी लिलियम पेना मोरालेस यांनी दोन महिन्यांपूर्वी त्याचे अपहरण केले होते. (Mother reunited with 6 year old who was kidnapped by his father)
शेवटी दोन महिन्यांच्या अंतरानंतर आपल्या मुलाला मिठी मारल्यानंतर त्याची आई यानेट कॉन्सेपसियनला अश्रू अनावर झाले. मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री उशिरा ते पुन्हा एकत्र आले. "मला फक्त त्याला मिठी मारायची आहे," कॉन्सेप्सियन म्हणाल्या.
न्यू ब्रन्सविकमधील कॅनेडियन वॉलमार्टमध्ये जोजोला पाहिल्यानंतर कोणीतरी पोलिसांना कॉल केला असे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे. "माझ्या मुलाचा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणत कॉन्सेपसियन यांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी मुलाचे वडील आणि आजीला ताब्यात घेतले आहे.
मेन स्टेट पोलिसांचे म्हणणे आहे की हे तिघे कॅनडाच्या सीमेजवळील लिटलटन, मेन येथे असलेल्या एसयूव्हीमध्ये असावेत. त्यानंतर सापडलेला अन्य कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. या मुलाचे वडील आणि आजीवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ महिन्यांनंतर मुलाला भेटल्यानंतर त्याची आई आता त्याच्यासोबत होलोविन पार्टी सेलिब्रेशन करणार असल्याचं सांगते. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेनं हाहाकार माजवलाय. सख्ख्या मुलाचं अपहरण वडिलांना का केलं असावं असा प्रश्न लोकांना पडलाय.