लहानपणी जेव्हा मुलं अभ्यास करत नाहीत तेव्हा त्यांचे आई वडील त्यांना अभ्यास करावा म्हणून ओरडतात. अनेकदा मुलं ऐकतच नाही म्हणून आईवडील मुलांना रट्टे देतात. पालकांनी मुलांना बदडून काढणं हे तसं काही घरोघर नवीन नाही. खरंतर मुलांना मारू नये, मुलांवर हात उचलणंच चूक आहे हे पालकांनी मान्य करुन मुलांना समजवण्याच्या वेगळ्या पद्धती वापरल्या पाहिजेत. पण अनेकदा पालकांचा पारा चढतो आणि मुलांना फटके दिले जातात. तसाच हा एक व्हायरल व्हिडिओ. आई रागावली म्हणून रडत बसलेल्या एका चिमुरड्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या छोट्याश्या मुलाची गंमत वाटेल. (Mother son viral video father is filming clip while mother scolding his son for not studying)
अभ्यासाला नाही म्हणतो म्हणून या चिमुरड्याची आई त्याला धोपटते आणि वहीवर आकडे लिहिण्यास सांगते. जवळच उभे असलेले मुलाचे वडील या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ शूट करत असतात. लेक रडत असताना आई रागात मुलाला अभ्यास करण्यास सांगते. पण मुलगा मात्र वेगळंच बडबडत असतो. (Mother son viral video)
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा हातात पेन्सिल घेऊन खोलीत बेडवर बसलेला दिसत आहे. वहीमध्ये तो त्याच्या आईच्या सांगण्यावरून आकडे लिहित आहे. रागावलेली आई आता वन नाइन (19) लिही असे म्हणताच मूल रडते आणि मग लिहू लागते. व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे वडील मध्येच रडणाऱ्या मुलाला म्हणतात, 'रडून काय उपयोग.' त्यावर मुलगा म्हणतो की, तुम्ही गप्प बसा.
हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा विचारही कधी केला नव्हता..' आईच्या निवृत्तीच्या दिवशी लेकाचं खास सरप्राईज
मग वडील म्हणतात की 'मी गप्प का बसू', तर मुलगा म्हणतो की 'तुम्ही माझी आई नाही, वडील आहात.' काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलगा गप्प बसलेला असताना आई-वडील आपापसात भांडत होते. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.