Join us

आईनं लेकाला घरच दिलं गिफ्ट, सरप्राइज घर पाहून मुलानं दिली ‘भन्नाट’ रिॲक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 13:25 IST

Mother Surprises Son with New House : या महिलेनं १८ ऑक्टोबरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि हजारो कमेंट्सही या व्हिडिओवर आल्या आहेत.

नवीन घर घेण्याचा आनंद  काही वेगळाच असतो. अशाच नवीन घराचं जर  कुटुंबातल्या व्यक्तीनं सरप्राईज दिलं तर आनंद गगनात मावेनासा होतो. इंस्टाग्राम हॅण्डल मार्टिस्ट्रीवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये एका मुलानं आपलं नवीन घर पाहिल्यानंतर दिलेली रिॲक्शन तुफान व्हायरल होत आहे.  या महिलेनं १८ ऑक्टोबरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि हजारो कमेंट्सही या व्हिडिओवर आल्या आहेत. (Mother surprises son with new house his reaction is viral on instagram watch here) 

व्हिडिओच्या सुरुवातीला एका मुलगा कारमध्ये बसून समोरच्या घरांकडे पाहत आहे. कार एका घरासमोर थांबते आणि समोरच्या पॅसेंजर सीटवर बसलेली महिला त्या मुलाला विचारते की मोठे घर हवे होते का? तो "हो" म्हणतो.  हा मुलगा घराचं सौंदर्य पाहत असताना हे मला हवंय असं म्हणतो. त्यानंतर ती महिला निरागस मुलाला आश्चर्याचा धक्का देते आणि म्हणते हे घर आपलंच आहे. त्यावर मुलगा म्हणतो काय? मग आई म्हणते खरचं हे आपलं घर आहे.'  मुलगा आनंदानं ओरडतो आणि  अश्रू अनावर होतात. बँकग्राऊंडमध्ये त्याच्या बहिणीचा आवाज ऐकू येतो.

जोडपं पहिल्यांदाच विमानात बसलं इंग्लिश जराही कळत नव्हतं, अनोळखी व्यक्तीनं केलं असं काही.....

या मुलाची रिएक्शन पाहून सोशल मीडिया युजर्स आनंदित झाले आहेत. त्यांनी एक या व्हिडिओवर कमेंटही केली आहे.  देव आपल्याला खूप आशिर्वाद देवो असं त्यांनी म्हटलं आहे. अभिनंदन, एका युजरनं सांगितलं की, मी सुद्धा असंच एक स्वप्न पाहिलं आहे जे लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया