Join us  

तान्ह्या बाळाला पोटाशी धरून आईनं केला अप्रतिम बॅले डान्स, बघा देखणा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2022 3:51 PM

Ballet Dance of a Mother With Her Child: मनात जर जबरदस्त इच्छा असेल, तर आपोआपच ती पुर्ण करण्याची ताकद मिळते... या एका आईचंही असंच होतं, बघा तान्ह्या बाळासोबत तिने केलेला अप्रतिम डान्स. 

ठळक मुद्देआई झाल्यावर तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याचं स्वप्न अपूरंच राहणार, असं वाटत असेल तर थोडं मोटिव्हेट होण्यासाठी आणि प्रेरणा मिळविण्यासाठी हा व्हिडिओ एकदा बघाच..

इन्स्टाग्राम किंवा सोशल मिडियावर शेअर होणारे काही व्हिडिओ खरोखरच खूप प्रेरणादायी असतात. असे व्हिडिओ पाहिले की खरोखरच काही वेगळं करण्याची, नवा विचार करण्याची उर्जा मिळते. त्यामुळेच असे मोटीव्हेशनल व्हिडिओ सोशल मिडियावर नेहमीच ट्रेण्डिंग असतात. सध्या असाच एका आईचा व्हिडिओ (Ballet Dance of a Mother With Her Child) सोशल मिडियावर गाजतो आहे. आई झाल्यावर नृत्यांगना होण्याचं किंवा तुमच्या इतर काही आवडीच्या गोष्टी करण्याचं स्वप्न अपूरंच राहणार, असं वाटत असेल तर थोडं मोटिव्हेट होण्यासाठी आणि प्रेरणा मिळविण्यासाठी हा व्हिडिओ (viral video) एकदा बघाच..

 

gracieholway या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण स्त्री तिच्या इतर मैत्रिणींसोबत बॅले डान्स करताना दिसते आहे.

योग्य फिटिंगप्रमाणे शिवूनही ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग मिळत नाही? करा १ सोपा उपाय

पण या स्त्रीचं वैशिष्ट्य असं की तिच्या पोटाला एक कांगारू बॅग असून या बॅगमध्ये तिचं अंदाजे ७ ते ८ महिन्याचं बाळ मोठ्या ऐटीत बसलेलं आहे. बाळाला सांभाळत ती मनसोक्त नृत्य करते आहे आणि तिचं बाळही अगदी शांत बसून तिला पुर्णपणे सहकार्य करत आहे. डान्स करताना होणाऱ्या आईच्या हालचालीही ते बाळ मस्त एन्जॉय करत आहे.

 

या व्हिडिओला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये ती नृत्यांगना म्हणतेय की, बॅले डान्सर होणं आणि आई होणं या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या होत्या. ही दोन्ही माझी स्वप्ने होती.

तुमच्याही नखांवर पांढरे ठिपके दिसतात? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा सांगतात त्यामागचं खरं कारण..

पण मला नेहमी असं वाटायचं की यापैकी कोणतंही एकच स्वप्न पुर्ण होऊ शकतं. पण आता अशा पद्धतीने नृत्य करताना मला जाणवतंय की या दोन्ही गोष्टी एकत्रितपणेही पुर्ण होऊ शकतात. आई होणं हा फक्त एक छोटासा ब्रेक आहे. तुमच्या करिअरला, स्वप्नांना मिळालेला पुर्णविराम नाही... हेच सांगणारा हा एक सुंदर व्हिडिओ.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलनृत्य